विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी संतप्त पालकांनी केली शिक्षकाची धुलाई
कार ही फोडली;पोलिसांनी केली शिक्षकास अटक
विदर्भ प्रजासत्ताक
दि.४अचलपूर
अचलपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या
शिंदी बु. येथील एका खाजगी संस्थेअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनीचा इंग्रजी विषयाच्या प्राध्यापकाने विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. यानंतर संतप्त पालकांनी शाळेवर धडक देत शिक्षकाच्या कृत्याचा निषेध करत त्याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत शाळेच्या परिसरात ठेवलेल्या शिक्षकाच्या कारची तोडफोड केली.
घटनेची माहिती होताच पथ्रोट पोलिस स्टेशनचे अधिकारी तत्काळ घटनास्थळावर दाखल होत परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी एसआरपीएफ पथक व
अतिरिक्त पोलिसांची कुमक घटनास्थळी बोलावली. या दरम्यान पालकांनी शाळेच्या आवारात घुसून शिक्षकाला ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या शिक्षकाने आपल्या बचावाकरिता स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. पोलिस अधिकाऱ्यांनी व नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त
नागरीक शिक्षकांप्रती रोष व्यक्त करत असतांना या शिक्षकास पोलिसांच्या सुरक्षतेत वाहनात बसून पथ्रोट येथे नेण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहीतीनुसार इंग्रजीच्या शिक्षकाने २५ नोव्हेंबर रोजी विद्यार्थीनीचा विनयभंग केला ही बाब मुख्याध्यापक आज सुटीवरुन शाळेत परत आल्यानंतर विद्यार्थीनीने बोलून दाखविली. या घटनेचे गांभीर्य पाहता मुख्याध्यापकाने तत्काळ शिक्षक व पालकांना बोलावून घेत हा प्रकार सविस्तर जाणून घेतला व पालक व मुख्याध्यापकांनी घडलेल्या प्रकाराची माहीती पोलिसांना दिली. पश्रोट पोलिस विद्यार्थीनीचे बयान नोदवित असून पुढील कारवाई सुरु
होती. गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून पालकांना शांतता ठेवण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षकाने यापूर्वीही याच संस्थेअंतर्गत येणाऱ्या हरम येथील विद्यार्थीनीची अशाच प्रकारे छेड काढल्याची तक्रार दाखल झाली होती.
—————————
आमच्या साईट ला अवश्य भेट द्या !
https://epaper.vidarbhaprajasattak.com
https://epaper.vidarbhaprajasattak.com
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !