
तीन वर्षीय चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाचा अत्याचार
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१७ येवदा
येवदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका तीन वर्षीय चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि. १६) घडली. या प्रकरणात येवदा पोलिसांनी नराधमाला गुरुवारी रात्री ताब्यात घेतले आहे.
प्रकाश भगवान पुंडकर (६५ रा.पोलिस ठाणे येवदा हद्दीतील) पीडित चिमुकली ही खेळत होती. त्यावेळी या नराधमाने चिमुकलीला स्वतःजवळ बोलावले. चिमुकली गेली असता त्याने घरात नेऊन चिमुकलीवर अत्याचार केला. या प्रकाराने चिमुकली घाबरली आणि रडत रडत घरी गेली. दुसरीकडे
मुलगी दिसत नसल्यामुळे चिमुकलीची आई तिचा शोध घेत होती. दरम्यान चिमुकली दिसताच तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. तिच्या शरीरावर रक्तसुद्धा होते. या प्रकरणी चिमुकलीच्या आईने तातडीने येवदा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी प्रकाश पुंडकर या नराधमाविरुद्ध बलात्कार तसेच पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल केला. यादरम्यान मात्र पुंडकर गावातून पसार झाला होता. पोलिसांनी दिवसभर त्याचा शोध घेतला. दरम्यान गुरुवारी रात्री जंगल परिसरात तो असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी रात्रीदरम्यान त्याला ताब्यात घेतले.