
महावितरण माहिती स्टॉलला भेट देत मुख्य न्यायमूर्ती श्री भूषण गवई यांनी घेतली महावितरणच्या योजनांची माहिती
विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यात महावितरणच्या विविध योजनांचा जागर
अमरावती,
धारणी येथे आयोजित विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यात विविध शासकीय विभागाप्रमाणे महावितरणने लावलेल्या माहिती स्टॉलला भारताचे मा. मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई आणि सर्वोच्च न्यायालयाचे मा.न्यायमूर्ती अभय ओक यांनी भेट दिली आणि महावितरणच्या विविध योजनांची माहिती घेतली. तसेच यावेळी ग्राहकांना योजनांची पुर्णपणे माहिती मिळावी यासाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टर्स, पॉंम्प्लेट आणि पुस्तिका या प्रचार साहित्याची पाहिणी केली.

महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ वीज ग्राहक व शेतकऱ्यांना मिळावा यासाठी धारणी येथे विधी प्राधिकरणाव्दारे आयोजित विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यात मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी आणि अधीक्षक अभियंता दिपक देवहाते यांच्या मार्गदर्शनात माहिती स्टॉल लावून विविध योजनांची माहिती देण्यात आली.वीज ग्राहकांचे विजबिल शून्य करणारी प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेत ७८ हजार रूपयापर्यंत अनुदान देण्यात येत आहे. तसेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत योजनेत अनुसूचित जाती व जमाती करीता ९५% आणि इतरांना ९०% अनुदान आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे शेतकऱ्यांना दिवसा विजेचे स्वप्न पूर्ण होणार असून कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडित वीज ग्राहकांना व्याज व विलंब आकारात संपूर्ण माफीसह सहा हप्त्यात वीज बिल भरून थकबाकीमुक्तीची संधी आहे, अश्या विविध योजनांची या स्टॉलच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.

यावेळी महावितरणच्या माहिती स्टॉलला विधी क्षेत्रातील इतर मान्यवरांसोबत हजारो शेतकरी व वीज ग्राहकांनी भेट देत माहिती घेतली. उपकार्यकारी अभियंता धारणी श्याम येनगंटिवार, सहायक अभियंता चक्रधर पटेल, सहाय्यक लेखापाल घावडे, तसेच शहर आणि ग्रामीण वितरण केंद्रातील कर्मचारी यांनी महावितरणच्या योजनांची माहिती दिली.
