
142 वर्षानंतर कमी होणार वलगावच्या जुन्या पेढी नदी पुलावरील भार
पहा नवीन पुलाचे लाइव विडिओ
वलगाव
अमरावती ते अचलपूर मार्गावरील वलगाव येथील पेढी नदीवर इंग्रजकालीन पूल हा १४२ वर्षांपूर्वी (वर्ष १८८३) बांधलेला आहे. त्या पुलाची वयो मर्यादा संपली. मात्र तो अजूनही सुस्थितीत आहे. परंतु, हा पूल अरुंद असल्याने अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे त्याच पुलाला समांतर दुसरा पूल बांधण्याचे काम साबांवि. ने अडीच वर्षांपूर्वी हाती घेतले होते. सध्या स्थित या पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, काही महिन्यांत हा पूल वापरासाठी खुला होणार आहे.
हा पूल ८ स्पॅनमध्ये प तयार केला आहे. एका स्पॅनची लांबी २७ मीटर आहे. पुलाच्या आठही स्पॅनचे स्लॅब पूर्ण झाले आहेत. आता केवळ मुख्य मार्गाला जोडण्याचे काम बाकी आहे. जुना पूल सुस्थितीत असल्यामुळे नवीन पुलावरून अमरावतीहून वलगावच्या दिशेने जाणारी वाहतूक राहणार आहे. याचवेळी वलगावकडून अमरावतीच्या दिशेने येणारी वाहतूक जुन्ऱ्याच पुलावरून केली जाणार आहे. २०२५ मध्ये वाहनधारकांना हा नवा पूल वापरासाठी मिळणार असल्याचे साबांवि अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
वलगावच्या पेढी नदीवरील हा पूल अंत्यत महत्वाचा आहे. या पुलावरून समोर गेल्यानंतर विदर्भाचे नंदनवन म्हणून परिचित असलेल्या मेळघाट (धारणी आणि चिखलदरा तालुका), अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, अचलपूर -परतवाडा, चांदूर बाजार या सहा तालुक्यांसह अकोला जिल्ह्यालासुध्दा हा मार्ग जोडल्या जातो. तसेच मध्यप्रदेशला जोडणारासुध्दा मुख्य मार्ग आहे. या नव्या पुलामुळे तब्बल १४१ वर्षानंतर पुलावरील भार कमी होणार आहे.



