‘त्या तरुणीच्या सहमतीने शारीरिक संबंध झाले’, आरोपी दत्तात्रय गाडेच्या पत्नीचा दावा
पुणे
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पत्नीने आरोप फेटाळला आहे. तरुणीच्या समंतीने संबंध झाले, असा दावा आरोपीच्या पत्नीने केला आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये आरोपीने तरुणीला शिवशाही बसमध्ये नेले आणि बलात्कार केला, असा आरोप आहे.
२५ फेब्रुवारी रोजी स्वारगेट बसस्थानकामध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडे याला ३६ तासांनंतर पोलिसांनी गुणाट गावाच्या शिवारात उसाच्या शेतात पकडले होते.
आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पत्नीने म्हटले आहे की, “दत्ता गाडे यांची पत्नी या नात्याने मला न्याय हवा आहे. ती मुलगी म्हणतेय की, माझ्या नवऱ्याने बलात्कार केला. बलात्कार केला, मग तिचे कपडे कुठे फाटले आहेत का? तिच्या अंगावर ओरबाडलेलं आहे का?”, असे प्रश्न आरोपीच्या पत्नीने उपस्थितीत केले आहेत. “आधी ती तरुणी बसमध्ये चढली आणि नंतर माझा नवरा चढला. त्यानंतर दोन मिनिटांमध्ये ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का?”, असेही आरोपीच्या पत्नीने म्हटले आहे.
“त्या तरुणीच्या सहमतीने शारीरिक संबंध झाले. तिच्यावर बलात्कार होत होता, तर त्या तरुणीने आरडाओरड का केली नाही?’, असे आरोपी दत्तात्रय गाडेच्या पत्नीने म्हटले आहे.
आरोपी गाडे पोलीस कोठडीमध्ये
दत्तात्रय गाडे हा बलात्काराच्या घटनेनंतर फरार झाला. पोलीस त्याच्या मागावर होते. तो जुन्नर तालुक्यातील गुणाट गावाच्या शिवारात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. मध्यरात्रीच्या सुमारास अखेर त्याला अटक करण्यात आले. आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
ताज्या बातम्यांचे अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा ! व वाचत रहा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक
तुम्ही पण तुमच्या लोकप्रिय ब्रँड ची जाहिरात आमच्या सोबत करू शकता मो. ८६०५९४८८५३