
किरीट सोमय्या यांनी गाडगेनगर पोलिसांना दिले 468 पानाचे पुरावे..
किरीट सोमय्या तिन महिन्यात चार वेळा अमरावती दौऱ्यावर…
बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट जन्म दाखले दिल्याच प्रकरण.
विदर्भ प्रजासत्ताक
दि.६ अमरावती
दि.६ अमरावती
अमरावती महानगरपालिका क्षेत्रात 4हजार 500 बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट कागदपत्राच्या आधारे प्रशासनाने जन्मदाखले दिल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला.. आतापर्यंत सहा लोकांवर मनावर कागदपत्र दिल्याचा आरोप करत गुन्हे दाखल केले आहे, दरम्यान आज किरीट सोमय्या यांनी अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये जात पोलीस निरीक्षक व पोलीस उपायुक्त यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली,
पहा काय म्हणालेत किरीट सोमय्या [ विडिओ ]
सोमय्या यांनी 468 पानाचे पुरावे मी पोलिसांना दिले, यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली, 50 लोकांनी जन्म दाखल्यांसाठी कुठलाही पुरावा दिला नाही. तर आज पोलिसांनी माझ बयान नोंदवल आहे तर अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटीयार विरोधात केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे, जिल्हाधिकाऱ्याचे लक्षात महिनाभरापुढे आणून दिलं तरी देखील त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.अमरावती जिल्ह्यात पाच ठिकाणी नायब तहसीलदार यांनी सुनावना केल्या ते आदेश बेकायदेशीर आहे.अमरावती शहरात साडे चार हजार जन्मदाखले बोगस आहे ते ताबडतोब रद्द करा व सर्वांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी त्यांनी केली.



ताज्या बातम्यांचे अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा ! व वाचत रहा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक
तुम्ही पण तुमच्या लोकप्रिय ब्रँड ची जाहिरात आमच्या सोबत करू शकता मो. ८६०५९४८८५३