
अमरावती मनपा आयुक्तांना वॉरंट
विदर्भ प्रजासत्ताक
दि.७नागपूर
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका शिक्षिकेच्या बदली प्रकरणामध्ये अमरावती महापालिका आयुक्तांना दहा रुपयांचा जामीनपात्र अटक वॉरंट जारी करून येत्या १९ मार्च रोजी प्रकरणावरील सुनावणीला हजेरी लावण्याचे निर्देश दिले आहेत.


आलिया फरहत, असे शिक्षिकेचे नाव असून त्या जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत २००६ पासून कार्यरत आहेत. २९ जून २०१७ च्या शासन निर्णयानुसार, अमरावती महानगरपालिकेच्या शाळेत सामावून घेतले जावे, यासाठी त्यांनी २१ जून २०१९ रोजी अर्ज केला होता. त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे फरहत यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तिद्वय अविनाश घरोटे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, त्यांनी महापालिका आयुक्त दीर्घ काळापासून न्यायालयात हजर झाले नसल्याची बाब लक्षात घेता वॉरंट बजावला आहे.
ताज्या बातम्यांचे अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा ! व वाचत रहा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक
तुम्ही पण तुमच्या लोकप्रिय ब्रँड ची जाहिरात आमच्या सोबत करू शकता मो. ८६०५९४८८५३