
आष्टगाव अंबाडा मार्गावर भीषण अपघात
1 ठार 2 जखमी
आष्टगाव अंबाडा मार्गावर चार चाकी च्या अपघातात एक ठार तीन गंभीर जखमी तालुक्यातील अंबाडा येथून मोर्शीला परत येत असताना झालेल्या अपघातात एक युवक घटनास्थळी ठार झाला असून इतर तीन जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शनिवार दि 8 मार्च रोजी संध्याकाळी 8वाजताच्या सुमारास घडली.
मोर्शी येथील दुर्गा नगर भागातील रहिवासी भारत फायनान्स मध्ये कार्यरत असणारे शाखा व्यवस्थापक गजेंद्र अनिल चरपे वय 32 वर्ष रा कुऱ्हा ता चांदूरबाजार तसेच त्यांचे सहकारी रुपेश यशवंतराव इंगोले वय 34 वर्ष रा जळका हिरापूर ता. भातकुली, यश प्रकाश बोरवार वय 21वर्ष रा कुऱ्हा ता. चांदूरबाजार व देवेंद्र थोरात रा गोराळा ता. मोर्शी हे आपल्या कंपनीच्या कामाकरिता गजेंद्र चरपे यांच्या चारचाकी गाडी क्रमांक एमएच 27 डी एल 3164 या वाहनाने अंबाड्याला गेले होते. तेथून मोर्शीला परत येत असताना अंबाडा-आष्टगावच्या मधील वळण रस्त्यावर भरघाव गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली.
या अपघातात रुपेश इंगोले नमक तरुणाचा घटनास्थळी ठार झाला तर इतर जखमींना अंबाडा येथील युवकांनी तात्काळ मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.त्यापैकी यश बोरवार हा गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
ताज्या बातम्यांचे अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा ! व वाचत रहा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक
तुम्ही पण तुमच्या लोकप्रिय ब्रँड ची जाहिरात आमच्या सोबत करू शकता मो. ८६०५९४८८५३