बंद असलेली शहर बस सेवा तत्काळ सुरु करा मनसेची मागणी
शहर अध्यक्ष गौरव बांते यांच्या नेतृत्वात आयुक्तांना निवेदन
दि5वि.प्रजासत्ताक अमरावती.
बडनेरा अमरावती शहरातील अनेक लोक महानगर पालीकेच्या वतीने असलेल्या शहर बस सेवेचा उपयोग घेत असतात. विशेषतः महिला वर्ग विद्यार्थी कामगार असे अनेक लोक आपल्या दररोजच्या कामा करीता शहरात या बसेवेच्यामाध्यमातून ये-जा करीत असतात. त्याच प्रमाणे बडनेरा अमरावती या दोन मुख्या रेल्वे स्थानका वरुन प्रवास करण्याकरीता या बस सेवेचा लोकांना उपयोग आहे. तरी गेल्या दोन महिन्यांपासून महापालीकेच्या वतीने कुठलेही ठोस कारण नसतांना हि बस सुविधा बंद करण्यात आलेली आहे. त्या मुळे नागरीकांची प्रचंड गैर सोय होत आहे. या संदर्भात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला असून शहर अध्यक्ष गौरव बांते यांच्या नेतृत्वात महानगर पालीका आयुक्त प्रविण आष्टीकर यांना निवेदन सोपविण्यात आले.
सर्व सामान्य जनतेला वेठीस न धरता कंत्राटदार व महापालीका प्रशासन यांच्यात असेला तिढा आपसात सोडवुन ही शहर बस सेवा तत्काल सुर न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा ईशारा या वेळी देण्यात आला.सदर निवेदना वेळी शहर अध्यक्ष गौरव बांते यांच्या समवेत, जिल्हा संघटन प्रविण डांगे, शहर संघटक बबलु आठवले, जिल्हाउपाध्यक्ष सचिन बावनेर कामगार सेनेचे विक्की थेटे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष हर्षल ठाकरे, सुशील पाचघरे, राम काळमेघ, पवन लेडे, अमर महाजन, ज्ञानेश्वर लांडे, राजु ढोरे, अश्विन सातव ,मयंक तांबुसकर ऋषीकेश वासनकर, ओम देशमुख, देवांशी निंभोरकर आदी उपस्थितीत होते.