चांदूर बाजार मधील बंद असलेले सफाई काम सुरू करा;
अन्यथा नगरपालिकेच्या आवारात कचरा टाकणार
चांदूर बाजार
गतवर्षी डेंग्यूच्या प्रकोपामुळे चांदूर बाजार शहरात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होते यातून चांदूरबाजार नगरपालिका कोणताच धडा घेतल्याचे दिसत नाही नगरपालिकेमधील स्वच्छता विभागामधील कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचा विभाग काढून अन्य अधिकाऱ्यांना देण्यात येत असतो दरम्यान चांदूर बाजार नगरपालिकेच्या हद्दीतील गेल्या अनेक दिवसांपासून सफाई कामकाज बंद असल्यामुळे डेंगू मच्छरांचा संसर्ग शहरात पसरला त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी व स्थानिक नागरिकांनी चांदूरबाजार नगरपालिकेवर धडक देऊन बंद असलेले सफाई कामकाज तात्काळ सुरू करण्याची मागणी केली घरोघरी जावून ओला व सुका कचरा गोळा करणे, गटर सफाई करणे, शहराच्या परिसरात झाडू मारण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने चांदूर बाजार शहरातील नागरिकांच्या घरात कचरा साचलेला असून त्यातून दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आरोग्य विभागातील इतरही कामे बंद असल्याने शहरातील साफसफाईचे तीनतेरा वाजलेले असून रोगाचा संसर्ग वाढण्याची परिस्थिती निर्माण झाली चांदूरबाजार मध्ये रखडलेले सफाई कामकाज तात्काळ सुरू झाले नाही तर ओला व सुका कचरा गोळा करून नगरपालिकेच्या आवारात टाकण्याचा इशारा भाजपाने निवेदन देऊन नगरपालिकेला केले त्यावेळी भाजपा ता.अध्यक्ष मुरली माकोडे, गोपाल तिरमारे,अजय उटाळे, संतोश ऊटाळे, शुभम कीटुकले, सै .समिर निलेश बोडखे,नाजीम अहेमद, पंकज बोडखे ,सागर अंबाळकर सह अनेक नागरिक उपस्थित होते.
चांदूर बाजार नगरपालिकेच्या आरोग्य विभागात कंत्राटदार संबंधित अधिकारी मिळून मोठा भ्रष्टाचार सुरू आहे नगरपालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राकदारासोबत मतदार संघातील एका मोठ्या राजकीय व्यक्तीचे हितसंबंध आहे त्यांच्या दबावातच आरोग्य विभागातील कंत्राटदाराचे काम सुरू आहे कंत्राट दराने काम बंद ठेवून शहरातील नागरिकांना वेठीस धरले आहे.
@ विदर्भ प्रजासत्ताक