यावर्षी मान्सून कसा असेल, पाऊस किती पडणार? हवामान खात्याने वर्तवला असा अंदाज
यावर्षी मान्सून कसा होईल, याकडे शेतकऱ्यांसह इतर सर्वसामान्यांचंही लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, हवामान खात्याने मान्सूनबाबतचा आपला महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. यावर्षी नैऋत्य मान्सूनच्या काळात भारतामध्ये सरासरी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी नैऋत्य मान्सूनच्या काळात उत्तर-पश्चिम भारत, पश्चिम भारत, मध्य आणि पूर्वोत्तर भारतामध्ये सामान्य ते सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दख्खनच्या पठारावरील भाग, त्याला लागून असलेला पूर्व आणि पूर्वोत्तर क्षेत्रातील काही भागात तसेच उत्तर-पश्चिम क्षेत्रातील काही भागांमध्ये सामन्य पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने सांगितले की, यावर्षी देशामध्ये जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत ८३.५ मिमी पाऊस पडेल. विभागाने सांगितले की, यावर्षी जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत ८३.५ मिमी पाऊस पडेल. विभागाने सांगितले की, यावर्षी जून ते सप्टेंबरपर्यंत ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस सामान्य पर्जन्यमानाच्या श्रेणीमध्ये येतो.
ही आकडेवारी स्टॅटिकल आणि डायनॅमिक पद्धतींच्या वापरामधून काढण्यात आली आहे. वातावरणाच्या दृष्टीने पाहिल्यास यावर्ष ६७ टक्के शक्यता आहे. पाऊस सामान्य किंवा सामान्यापेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
यावर्षी अल निनोचा प्रभावही पाहायला मिळणार आहे. म्हणजेच दुष्काळासारख्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार अल निनोची स्थिती मान्सूनदरम्यान, विकसित होऊ शकते. तसेच मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात याचा प्रभाव दिसून येऊ शकतो. मात्र याचा अर्थ पाऊस कमी पडेल असा नाही. गेल्या काही वर्षांमध्ये अल निनोच्या दरम्यान, सामान्य आणि सामान्यापेक्षा अधिक पाऊस पडला आहे.