 
                बेघर ग्रामस्थांचे अतिक्रमण नियमीत करा
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
अमरावती,
 : शहरालगत असलेल्या हातुर्णा येथे बरेच लोक ३० ते ३५ वर्षांपासून राहत आहेत. अनेकांना गावांमध्ये जागा नाही. एवढेच नव्हे तर, ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल योजनेपासूनही वंचित ठेवल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
बेघर ग्रामस्थांचे शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमीत करून द्यावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी बुधवारी (ता.१२) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. उपजिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सुषमा मोरे यांनी सादर केले.
 हातुर्णा येथील पुनर्वसन जागेमध्ये जी काही शासकीय जमिन शिल्लक आहे, त्याठिकाणी आठ महिन्यांपासून अतिक्रमण करून लोक राहत आहे. अतिक्रमण नियमीत करून देऊन राज्य सरकारने जी योजना हाती घेतली आहे, त्यानुसार बेघरांना घरे देण्याची मागणी सुषमा मोरे यांनी यावेळी केली. शिवाय अतिक्रमीत जागेवर शासकीय नियमानुसार होणाऱ्या दंडाची रक्कमही हे गोरगरीब भरण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे बेघरांना तातडीने शासकीय घरकुल योजनेचा लाभ द्यावा असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सुषमा मोरे, सुशीला वानखडे, मंदा तायडे, रजनी बघल्ले, चंदा मुकेश्वर, रजनी सोळंके, वर्षा दळवी, उज्वला गुडधे, रंजना कुरवाडे, शारिका कुरवाळे, संगीता जाधवसह इतरांची उपस्थिती होती.
हातुर्णा येथील पुनर्वसन जागेमध्ये जी काही शासकीय जमिन शिल्लक आहे, त्याठिकाणी आठ महिन्यांपासून अतिक्रमण करून लोक राहत आहे. अतिक्रमण नियमीत करून देऊन राज्य सरकारने जी योजना हाती घेतली आहे, त्यानुसार बेघरांना घरे देण्याची मागणी सुषमा मोरे यांनी यावेळी केली. शिवाय अतिक्रमीत जागेवर शासकीय नियमानुसार होणाऱ्या दंडाची रक्कमही हे गोरगरीब भरण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे बेघरांना तातडीने शासकीय घरकुल योजनेचा लाभ द्यावा असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सुषमा मोरे, सुशीला वानखडे, मंदा तायडे, रजनी बघल्ले, चंदा मुकेश्वर, रजनी सोळंके, वर्षा दळवी, उज्वला गुडधे, रंजना कुरवाडे, शारिका कुरवाळे, संगीता जाधवसह इतरांची उपस्थिती होती.दाखल गुन्हा मागे घेण्याची मागणी
जीवे मारण्याची धमकी आणि अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत दाखल गुन्ह्याची चौकशी करावी. घरकुल योजनेसंदर्भात हातुर्णा ग्रामपंचायतमध्ये चौकशी केल्यामुळे हा गुन्हा राजकीय दबावातून दाखल करण्यात आला. त्यामुळे तो मागे घ्यावा, अशी मागणी सुषमा मोरेंसह हातुर्णा येथील बेघर महिला व ग्रामस्थांनी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.


 
                     
                     
                     
                    