दिशाभूल करणारी माहिती पसरवून बदनामी करण्याचा राजकीय विरोधकांचा डाव – शेखर भोयर
दि12 वि.प्रजासत्ताक अमरावती
दिनांक २८ मार्च २०२३ रोजी रवि भवन नागपूर येथे एसीबीने टाकलेल्या ट्रॅपमध्ये माझा घटनास्थळी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे माझा या प्रकरणाशी संबंध नाही. तक्रारकर्त अधिकारी रविंद्र भुयार यांच्या तक्रारीमध्ये माझ्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. प्रत्यक्ष घटनास्थळी ट्रॅपमध्ये लाच घेतांना दिलीप खोडे यांना एसीबी ने अटक केली असता त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला. त्यामुळे सदर प्रकरण न्यायालयीन स्तरावर सुरु झालेले असून या प्रकरणात मला मा, न्यायालयाने बिनशर्त जामीन मंजूर केला.
मी गेल्या १२ वर्षापासून शिक्षण व सामाजिक क्षेत्राशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी सतत शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असून समस्याग्रस्तांना न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. त्यामुळे माझा मंत्रालयीन स्तरावर प्रत्यक्ष संबंध येत आहे. तसेच मी शिक्षण क्षेत्राशी जुळलेलो असल्यामुळे मी अगरायती शिक्षण विभागाची शिक्षक आमदारकीची लढविली असून मला चांगल्या पसंतीची मसुदा त्यामुळे कदाचित माझे अपना राजकीय विरोधक या घटनेचा गैरफायदा उठविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नाकारता येत नाही. सदर प्रकरणाला मी न्यायालयीन स्तरावर पूर्ण सहकार्य करीत आहे. त्यामुळे माझ्या हितचितक शिक्षक व मित्र मंडळींनी अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर पूर्ण विश्वास ठेवू नये असे आवाहन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.