 
                व्हाइट शर्टमधील अमृता खानविलकरचे ग्लॅमरस फोटो पाहून विसराल मलायका अरोराला,
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने रसिकांवर मोहिनी घातली आहे. अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे. अमृताने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अमृता स्टायलिश आणि स्टनिंग दिसतेय.. अमृताच्या या किलर लूकवर चाहत्यांसह सेलिब्रेटीही फिदा झाले आहेत. त्यांनी या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
सुरुवातीला एक डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. अमृतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.फोटोमधील तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहतेही घायाळ होत असतात.

मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे..राजी’, ‘सत्यमेव जयते’ , ‘मलंग’ अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत.लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहिली आहे.


 
                     
                     
                     
                    