रोजगार प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार, परिश्रमाची फलश्रृती : डाॅ. संयाेगिता देशमुख
अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय पाळा येथील १५ विद्यार्थ्यांना राेजगार व निराेप समारंभ
अमरावती दि.१५
: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राेजगार क्षेत्रात सक्षम करणे हे प्रत्येक महाविद्यालयाकरीता एक आव्हान असते. त्या दृष्टीकाेणातून जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय म्हणून साै. वसुधताई देशमुख अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय पाळा सातत्यपूर्वक विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याचे शिल्पकार ठरत आहे. अर्थात, त्याकरिता वर्तमान औद्याेगिक क्षेत्र व अभ्यासक्रम यामध्ये ताळमेळ घालत विद्यार्थ्यांना विविध राेजगार विषयक प्रशिक्षण व तज्ञांचे मार्गदर्शन करण्यावर महाविद्यालय भर देत आहे. म्हणून येथील प्रत्येक विद्यार्थी शिकत असतांना त्याला राेजगार प्राप्त होत असताे. त्या अनुषंगाने आता नव्याने विद्यार्थ्यांकरिता डिप्लोमा आणि प्रमाणपत्र सुरु करण्यात येणार आहे. सोबतच अल्युमिनि असोसिएशन संपर्काद्वारे विद्यार्थ्यांना रोजगार क्षेत्रामध्ये नवीन संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. या उपक्रमांमुळे अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय विद्यार्थ्यांना दरवर्षी शंभर टक्के राेजगार देत असून रोजगार प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयाच्या नियोजनबद्ध व अथक परिश्रमाची फलश्रुती असल्याचे मत प्राचार्य डाॅ. संयाेगिता देशमुख यांनी व्यक्त केले.
श्रमसाफल्य फाउंडेशन द्वारा संचालीत साै. वसुधाताई देशमुख अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय पाळा अंतीमवर्ष राेजगारप्राप्त सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार व निराेप समारंभाचे आयाेजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डाॅ. वैशालीताई देशमुख, प्रा. उदय देशमुख, डाॅ. योगिता सव्वालाखे, डाॅ. रूपाली देशमुख, डाॅ. दिपाली देशमुख, प्रा. डाॅ. रुपेश पावशे, प्रा. हितेश गावंडे, डाॅ. गौरी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने झाले. दरवर्षी प्रमाणे यंदाही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये निवड झाली आहे. त्यापैकी साेहळ्याला उपस्थित विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये अनिकेत आमले, उदय देशमुख, पल्लवी जयस्वाल, समृद्धी राठोड, मनिष सुकर, सुरज बुरडे, दिपक चव्हाण, कपील साखरे, राेहित काकस, काैस्तुभ देशमुख, सारंग ठाकरे, श्रीरंग, सृष्टी गाैरे, राजवी शेंडे, प्रतिक्षा घुरे या विद्यार्थ्यांचा हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक सादर करताना उपप्राचार्या डॉ. वैशालीताई देशमुख म्हणाल्या, साै. वसुधाताई देशमुख अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय असून येथील विद्यार्थ्यांना राेजगार व स्वयंराेजगार अशी दुहेरी उज्वल भवितव्याची संधी सातत्याने प्राप्त हाेत आहे. दरवर्षी महाविद्यालयातील शंभर टक्के विद्यार्थ्यांना शंभर टक्के राेजगार व स्वयंराेजगाराच्या संधी उपलब्ध हाेत आहे. आज महाविद्यालयातील विद्यार्थी देशातील व विदेशातील नामांकीत कंपनीमध्ये यशस्वी कार्यरत आहेत. इतर अभ्यासक्रमामध्ये शिक्षण पुर्ण केल्यानंतर राेजगाराकरीता नवीन प्रशिक्षण घ्यावे लागते मात्र, अन्न तंत्रज्ञान अभ्यासक्रमामध्ये प्रवेश झाला की, रोजगार व स्वयंरोजगार खात्रीशिर मिळत असताे हा आजवरचा अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचा यशाचा आलेख आहे. त्यामुळे बारावी नंतर उज्वल भवितव्याची इच्छा बाळगणाèया विद्यार्थ्यांनी अन्नतंत्रज्ञान अभ्यासक्रमाला प्राधान्य द्यावे असे आवाहन करीत यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचलन अजिंक्य शेरकी याने तर आभार धनश्री सावरकर हिने मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व माेठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित हाेते.
विद्यार्थ्यांच्या यशाचे समाधान
विद्यार्थ्यांना शिक्षणासाेबत राेजगार व स्वयंराेजगार तात्काळ मिळावा या जाणीवेतून अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे शिक्षण मिळाल्यास ताे स्वयंरोजगार यावर भर देण्यास सक्षम होते. आज अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय पाळा येथील प्रत्येक विद्यार्थी राेजगाराची कास धरत आहे. दरवर्षी महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थी महाविद्यालयाचे नाव लाैकीक करीत आहे याचे समाधान असल्याचे मत अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या अध्यक्षा, माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांनी व्यक्त केले.
@विदर्भ प्रजासत्ताक