शिवसेनेला अधिक गरज, पण वज्रमुठीचं एक-एक बोट उघडतय; भाजपचा दावा
अमरावती
राज्यात एकनाथ शिंदे गटाने बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिंदे सरकार अस्तित्वात येऊन आता अनेक महिने उलटले असून महाराष्ट्रात पुढील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मविआकडून वज्रमुठ आवळण्यात आली. मात्र या वज्रमुठीतील एक-एक बोट उघडत असल्याची दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
काँग्रेसमधील अनेक गट या सभेपासून स्वत:ला दूर ठेवू इच्छितात. खर तर शिवसेनाला अधिक गरज आहे. ते एका हाताने राष्ट्रवादीला आणि दुसऱ्या हाताने काँग्रेसला सांभाळू पाहतेय आणि स्वत:चं अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करत असल्याचही बोंडे यांनी नमूद केलं.याआधी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली होती. त्याचं कारण म्हणजे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यातच आता काँग्रेसमधील काही गट अजुनही नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. उद्या नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा आयोजित करण्यात आली आहे.
भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले की, कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला सभा घेण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. लोकशाहीमध्ये तो आवश्यक आहे. मात्र वर्तमानपत्रातूनच वाचायला मिळतं की, नितीन राऊत नाराज आहे. शिवाय, नाना पटोले यांना २१ किंवा २२ तारखेला राहुल गांधी यांनी बोलवलं आहे. काँग्रेसही सभा घेणार आहे. त्यांच्यातच तारतम्या नाही. त्यामुळे या वज्रमुठीचं एक-एक बोट उघडायला लागलं, असा दावा बोंडे यांनी केला.