चांदूर बाजार मधील मॉर्डन वाईन शाॅपचे परवानगी शिवाय नूतनीकरण
जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना वारंवार तक्रार
चांदूर बाजार न.प. मुख्याधिकारी पानझडे यांचे दुर्लक्ष!
चांदूर बाजार
गेल्या वर्ष २०२२ ते वर्ष २०२३ मार्च पर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाची तालुक्यात एकही कार्यवाही नाही चांदूर बाजार शहरासस तालुक्यात बिअर बार व्यवसायिकांकडून सर्व नियमांना केराची टोपली दाखवत नियमाबाह्य मनमानी कारभार सुरू आहे दरम्यान चांदूर बाजार मधील वाईन शॉप चे राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक प्रशासनाची नूतनीकरण करण्यास बांधकाम सुरू करण्याची परवानगी न घेता वाईन शॉप चे नूतनीकरण करण्यात आले त्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसते त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांना या संदर्भात वारंवार तक्रार करूण दखल घेतली नाही नगरपालिकेच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये मागील गेल्या अनेक वर्षांपासून असल्यामुळे अवैदरीत्या विनापरवानगी शिवाय नूतनीकरणाचे बांधकाम केल्याची माहिती करण खंडारे यांनी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना दीली
नगर परिषद चांदूर बाजार हद्दीतील वाईन शॉप च्या अनधिकृत नूतनीकरणाचे बांधकाम करणाऱ्या परवानाधारकावर कारवाई करून मोहर लावण्यात यावी अशी मागणी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक तथा अमरावती जिल्हाधिकारी, सह आयुक्त नगरपालिका प्रशासन, ऊपविभागीय अधिकारी अचलपूर व मुख्याधिकारी चांदूर बाजार यांना तक्रार करून केली.
मॉडर्न वाईन शॉप परवानाधारकाला पाठबळ कोणाचे?
चांदूर बाजार मधील मॉडर्न वाईन शॉप चे विनापरवानगी शिवाय नूतनीकरणाचे बांधकाम करण्यात आले या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून राज्य उत्पादन शुल्क व मुख्याधिकारी पानझडे यांना वारंवार तक्रार अर्ज सादर करून दूरध्वनी आणि दालनात जाऊन माहिती दिली तरीसुद्धा मॉर्डन वाईन शॉप परवानाधारकावर अद्यापही कारवाई झाली नाही त्यामुळे तात्काळ परवानाधारकावर कार्यवाही करून दुकानाला मोहर लावण्यात यावी.
@विदर्भ प्रजासत्ताक
करण खंडारे चांदूर बाजार