एका पदासाठी पोलीस भरतीतील उमेद्वाराने एकापेक्षा जास्त केलेले अर्ज रद्द करा
विद्यार्थ्यांचे चांदूर बाजार तहसील कार्यालयावर धडक!
दि20वि.प्रजासत्ताक चां.बाजार
मुंबईतील सहा हजार ७४० जागांसाठी तब्बल सात लाख उमेदवारांचे अर्ज आहेत अजूनही मैदानीच चाचणी संपलेली नाही तत्पूर्वी, सर्वच जिल्ह्यातील उमेदवारांची मैदानी व लेखी परीक्षा संपली आहे चालक पदांचा निकाल देखील जाहीर झाला असून आता काही दिवसांत शिपायांचीही निकाल लागनार आहे दरम्यान महाराष्ट्र पोलीस शिपाई पोलीस भरतीसाठी काही उमेदवारांनी एका पदासाठी एका पेक्षा जास्त अर्ज केले त्यामुळे इतर उमेदवारांचे नुकसान झाले त्या अनुषंगाने चांदूरबाजार तालुक्यातील पोलीस शिपाई भरती देत असलेल्या उमेदवारांनी एका पदासाठी पोलीस भरतीचे उमेदवारांनी एकापेक्षा केलेले अर्ज रद्द करण्यासाठी चांदूरबाजार तहसील कार्यालयावर धडक देऊन एकापेक्षा जास्त केलेल्या उमेदवारांचे अर्ज रद्द करण्याची नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांना मागणी केली महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश २०२१ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या दिनांक २६/०६/२०२२ चा केलेल्या सेवाप्रवेश नियमात सुधारित तरतुदी नुसार पोलिस आयुक्त मुंबई यांच्या स्थापनेवरील पोलिस शिपाई यांच्या रिक्त असलेल्या एकुण १८३३१ पदे भरण्यासाठी आवेदन संगणकीय प्रणालीद्वारे ० ९ / ११ / २०२२ ते १५/१२/२०२२ कालावधीत स्वीकारण्यात आले होते याबाबतची सविस्तर माहिती प्रसिध्द करण्यात आली परंतु उमेदवारांना एक घटकात एक पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू शकत नाही
उमेदवारांना दिलेल्या सुचनाच्या परिपत्रकामध्ये नियम १६ नमुद असूनही उमेदवारांनी चुकीची माहिती टाकून एका पेक्षा जास्त अर्ज सादर केले शासनाने वेळोवेळी उमेदवारांसाठी सुचनाचे उमेदवारांनी गांभीर्याने घेतले नाही काही उमेदवारांनी स्वतःची इमेल आयडी व मोबाईल नंबर बदलून एका पेक्षा जास्त अर्ज केले व शासनाची दिशाभुल केली त्यामुळे एका पदासाठी वेगवेगळ्या जिल्हयात त्यांचीच निवड झाल्याची यादी प्रसिध्दी झाली आहे त्यामुळे इतर उमेदवाराचे नुकसान झाले एकापेक्षा जास्त अर्ज करणारे उमेद्वारांनी नियमाचे उल्लंघन करून मिरीट लिस्ट वर परिणाम झाला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला व पुन्हा नवीन यादी शासनाने जाहीर करावी असेही निवेदन देणाऱ्या पोलीस भरतीतील उमेदवारांनी निवेदनामध्ये नमूद केले निवेदन देताना जयकुमार डोंगरे, सुमित गवळी,नितीन पुनासे, किशन मेश्राम, सुरज मोहोड,रोहित वाटकर, अभिषेक सोळंके सह आदी पोलीस भरतीतील उमेदवार उपस्थित होते.
@ विदर्भ प्रजासत्ताक
करण खंडारे
करण खंडारे