विविध विकासकामांमुळे शेतीसाठी पुरेशी जमिनही शिल्लक नाही – पवारांनी व्यक्त केली चिंता
अमरावती
शेती देशाचा महत्वाचा प्रश्न आहे. या देशाला स्वतंत्र मिळाले तेव्हा 80 टक्क्यांपेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून होते. उत्पादन घेत होते मात्र जमिन अजून वाढलेली नाही, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
अमरावती मध्ये आज कृषी पदवीधर संघटनेच्या प्रथम राज्यस्तरीय अधिवेशनात उपस्थितांना मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते. राज्यात अवकाळी पाऊसामुळे शेतकरी मोठ्या संकटात आहे. अशात सध्या विविध विकासकामांमुळे शेतीसाठी पुरेशी जमिनही शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे या मुद्दायवरून शेती विषयी पवारांनी उपस्थित व्यक्तींना मार्गदर्शन केलं आहे.
देशात 56 टक्के जमीन पिकाखाली आहे. दिवसेंदिवस 56 टक्क्यांचे प्रमाण कमी होत आहे. राज्यात समृद्धी महामार्ग झाला त्यात जमीन ही शेतकऱ्यांची गेली व जमिन कमी झाली.विकासाचे प्रकल्प होत असताना शेतकऱ्यांची जमिन घेतली जाते त्यामुळे शेतकऱ्यांनची जमिन कमी होत आहे. लोकसंख्या वाढते व जमीन कमी होते आहे मग शेती कशी होणार?, असा प्रश्न शरद पवारांनी यावेळी उपस्थित केला आहे.
पंजाबमध्ये 91 टक्के जमिन आणि 81 टक्के पाणी आहे पण महाराष्ट्रामध्ये 38% पाणी शेतीला मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. आम्ही आमच्या काळात 78 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. शेतकाऱ्यांना उत्पन्नाचे नवीन साधन नाही, असं शरद पवार म्हणाले.
शेतकऱ्यांच्या शेतीला भाव नसेल तर त्याला आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागते. मी मंत्री पद सोडलं तेव्हा जगातला तांदूळ निर्माण करणारा भारत पहिला देश होता. तसेच जगात गहू उत्पादन करणारा भारता देश दुसऱ्या क्रमांकावर होता, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
शरद पवार हे अमरावती दौऱ्यावर आहेत. तेथे ते म्हणाले, विकासकामांसाठी शेतकऱ्यांची जमीन घेतली जात आहे. एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांची जमीन घेतली जात आहे. याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. शेतीचा धंदा अडचणीचा होत चालला आहे. जमीन कमी होत चालली आहे.
शरद पवार म्हणाले, सन २००४ ला मी शेतीमंत्री झालो. त्यावेळी देशाच्या गोदामात एक महिना पुरेल एवढंच धान्य शिल्लक होतं. त्यामुळे धान्य आयात करावं लागणार होतं. मी त्या निर्णयावर सही करत नव्हतो. मला पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा फोन आला. धान्य आयात केलं नाही तर उपासमारीने लोकं मरतील, असं मनमोहन सिंग यांनी मला सांगितलं. मी सही केली. पण डोक्यात ठरवलं की यापुढे देशावर आयात करण्याची वेळ येणार नाही. २०१४ साली तांदुळ निर्यातीत भारत अग्रक्रमांकावर आला. गहु आणि साखरेची निर्यात सुरु झाली. हे सर्व शक्य झालं ते कष्टकरी शेतकऱ्यामुळे, असं शरद पवार यांनी सांगितलं. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांसाठी मांडलेल्या मुद्द्यांचीही आठवण शरद पवार यांनी करुन दिली.मुलीच्या लग्नासाठी सावकराकडून कर्ज काढलं होतं. अपेक्षेप्रमाणे पिक आलं नाही. सावकराने पैशासाठी तगादा लावला. तुझ्या घरातील भांडीच घेऊन जातो, असं सावकाराने धमकावलं होतं. उद्या मुलीचं लग्न आणि सावकर घरातील भांडी घेऊन जाणार या भितीने शेतकरी व्यथित होता. त्याला झोप लागली नाही आणि त्याने आत्महत्या केली. म्हणजे समाजातील प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्याने आत्महत्या केली. आम्ही लगेचच देशभरातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची यादी मागवली. त्यावेळी ७८ हजार कोटींचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.
@ विदर्भ प्रजासत्ताक