
सनातन धर्मावरून राजकीय रणधुमाळी; नितेश राणेंचा जितेंद्र आव्हाडांवर तीव्र पलटवार
मोर्शी
सनातन धर्मावर केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड सध्या टीकेच्या केंद्रस्थानी आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी मोर्शीत पत्रकारांशी संवाद साधताना आव्हाडांवर घणाघात केला.

राणे यांनी आव्हाडांना उद्देशून गंभीर आरोप करत म्हटले की “ते जिहाद्यांना खूश करण्यासाठी सनातन धर्माला अपशब्द वापरतात. त्यांच्या मतदारसंघातच जिहाद्यांचा अड्डा आहे, त्यांचं समाधान करण्यासाठीच आव्हाड अशा प्रकारची विधाने करतात.त्यांनी धर्माच्या संदर्भात अधिक परखड सवाल उपस्थित करत म्हटले”कोणत्याही मुस्लिम किंवा ख्रिश्चन नेत्याने आपल्या धर्माबाबत कधी अपमानास्पद वक्तव्य केलं आहे का? मग जितू उद्दीन (जितेंद्र आव्हाड) कोणत्या अधिकाराने सनातन धर्मावर टीका करतात?”
राणे पुढे म्हणाले की,दु:ख याचं आहे की, काही लोक हिंदू म्हणून जन्म घेऊन स्वतःच्या धर्मालाच शिव्याशाप देतात. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना काय वाटतं यावर? आव्हाडांच्या विचारांशी ते सहमत आहेत का?”
या राजकीय प्रतिक्रियेमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक ध्रुवीकरण अधिक तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत. राणेंच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दबाव वाढण्याची शक्यता असून, राज्यात धर्मविषयक वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
