गुरुकुंजात ग्रामजयंती महोत्सवात ग्रामनाथांचा सन्मान , गोपाल काल्याने ग्रामजयंती महोत्सवाची सांगता
दि.30 , गुरुकुज मोझरी
जयंत निखाडे
आपल्या खंजिरी भजनाच्या माध्यमातून अखिल विश्वाला मानवता व, सर्वधर्म, समभावाचा, संदेश देणारे, व. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, यांचा ११४ वा जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती महोत्सव त्यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज नगरी येथील महासमाधी परिसरात आज पहाटे पाच वाजता ब्रम्हमुहूर्तावर गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत सामुदायिक ध्यानाने हा हृदस्पर्शी सोहळा ग्रामजयंती महोत्सवाच्या रुपात साजरा करण्यात आला. या ग्रामजयंतीच्या शुभ पर्वावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज नगरीत गावकऱ्यांनी आज ग्रामस्वच्छता केली. दरम्यान तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी परिसर दिव्यांनी सजवून, यावेळी आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.. – .
एक तास तुकडोजी महाराजांची भजने.. तुकडोजी महाराजांच्या जन्मोत्सवावेळी असलेली परिस्थिती मांडण्यात आली. त्यानंतर सामुदायिक ध्यान, व महाआरती पार पडली.यावेळी, दामोदर पाटील (उपसर्वाधिकारी), यांनी सामुदायिक ध्यानांनतर चिंतन व्यक्त केले, मागील गेल्या दीड महिन्यापासून श्री, गुरुदेव महिला मंडळाच्यावतीने महासमाधी स्थळी, सामुदायिक ग्रामगीता पठण हा दैनदिन कार्यक्रम येथे पार पडला असून गेल्या तीन दिवसांपासून गुरुकुजातील महासमाधी परिसर येथे हा ग्रामजयंती महोत्सव सुरु आहे, आज संध्याकाळी गोपाल सालोडकर, यांच्या खंजरी भजन, व भक्ती संगीताच्या कार्यक्रमाने राष्ट्रवंदना घेऊन आयोजित कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,
या तीन दिवसीय आयोजित कार्यक्रमात, शेतात तिफन घेऊन राब -राब राबणाऱ्या शेतकरी किरण कांडलकर, पुरुषोत्तम बालपांडे, रमेश हीवे, यांच्यासह पाच ग्रामनाथ शेतकऱ्यांना अखिल भारतीय श्री, गुरुदेव सेवांमडळच्या वतीने शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले,
शेतकरी हा जगाचा पेशींदा असून कृषिप्रधान देशात शेतकऱ्याचा सन्मान हीच खरी ग्रामजयंती असल्याचे मत प्रचारप्रमुख प्रकाश वाघ, यांनी व्यक्त केले यावेळी उपस्थित संचालक मंडळाच्या अध्यक्षा, पुष्पा बॉंडे, लक्ष्मणराव गमे,सर्वाधिकारी, सरचिटणीस जनार्दनपंथ बोथे, दामोदर पाटील, दिलीप कोहळे, गुलाब खवसे,भानुदास कराळे, यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर यावेळी उपस्थित होती
भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावणात तीन दिवसीय आयोजित कार्यक्रमाची गुरुकुजातून शोभायात्रा काढून ह,भ,प, प्रकाश वाघ (प्रचारप्रमुख) रघुनाथ कर्डीकर, शंकरराव इंगळे, अजय चव्हाण, यांच्या गोपाल काला, किर्तन, व महाप्रसादाणे आयोजित ग्रामजयंती महोत्सवाची सांगता करण्यात आली
सदर कार्यमाच्या यशस्वीतेकरीता ग्रामजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष, श्रीकृष्ण दळवी, उद्धव वानखडे, व सहभागी महिला मंडळ व भाविकांनी अथक परिश्रम घेतले.
@ विदर्भ प्रजासत्ताक वेब न्यूज
ताज्या बातम्यांचे अपडेट सर्वात आधी वाचण्यासाठी आमच्या ग्रुप ला जॉईन व्हा !