मध्यरात्रीपासूनच महावितरणचे युध्दस्तरावरी प्रयत्न सुरू
२९ वाहिन्यांचा वीज पुरवठा दुपारपर्यंत पुर्ववत
उर्वरित ७ वाहिन्यांचा वीज पुरवठा संध्याकाळ पर्यंत होणार पुर्ववत
वादळाचा कहर,शहरात ५० पेक्षा जास्त ठिकाणी वीज वाहिन्यांवर पडली झाडे
अमरावती,
शनिवार रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा मोठा फटका महावितरणला बसला आहे. अमरावती शहरात पन्नासपेक्षा जास्त ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे,झाडाच्या फांद्या पडल्याने ३३ केव्ही एम.आय.डी.सी.,३३ केव्ही बडनेरा,३३ केव्ही वडाळी या उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या अतीउच्चदाब वाहिन्यासह ११ केव्ही दाबाच्या ३३ वाहिन्यांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.परिणामी सुमारे ६७ हजार ग्राहक अंधारात गेली होती.
वादळ थांबताच मध्यरात्रीपासूनच महावितरण अभियंते व जनमित्रांचे अथक प्रयत्न सुरू असल्याने दुपारी १ वाजेपर्यंत ३३ केव्ही एम.आय.डी.सी.,३३ केव्ही बडनेरा,३३ केव्ही वडाळी या अती उच्चदाबाच्या वाहिनीसह ११ केव्हीच्या २७ वाहिन्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरण कर्मचाऱ्याला यश आले आहे.आज संध्याकाळपर्यंत शहरातील खंडित झालेला संपूर्ण वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरू आहे.
जिल्ह्यात काल पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने अमरावती शहरात सरोज कॉलनी येथे वीज वाहिनीवर झाड पडल्याने डी.पी.स्ट्रक्चर,पोल जमीनीलगत झुकले,एम.आय.डी.सी.परिसरात,तसेच वैभव कॉलनीतही वीज वाहिनीवर झाड पडले,बडनेरा न्यू टाऊन परीसरात वीज वाहिनीवर झाड पडल्याने ३३ केव्ही वाहिनीचे तीन पोल तुटले आहे. बालाजी प्लॉट गोपल नगर,दस्तूर नगर परिसरातही वीज वाहिनीवर झाड पडल्याने महावितरणचे शहरात लघुदाबाचे ५२ पोल पडले/तुटले. तर ६० ठिकाणावरच्या वीज वाहिन्या तुटल्या आहेत.११ केव्ही वाहिनीचे ३२ ठिकाणचे पोल जमिनीलगत झुकले,त्यामुळे सुमारे ३० लोकशनच्या वीज वाहिन्या क्षतीग्रस्त झाल्या होत्या,तर सरोज कॉलनी आणि अकोला रोड टि.पॉंईट अश्या २ ठिकाणच्या डीपीही जमीनीवर पडल्या होत्या.
वीज पुरवठा सुरळीत करतांना सुरूवातील ३३ केव्ही वीज वाहिन्याला प्राधान्य देत ३३ केव्ही वडाळी वाहिनीचे पोल तुटल्याने या वाहिनीला ३३ केव्ही विद्युत भवन उपकेंद्रातून बॅकफिडींग करण्यात आले.३३ व्ही बडनेरा वाहिनीचा वीज पुरवठा रात्री २ वाजताच्या सुमारास दुरूस्त करण्यात आला.तर ३३ केव्ही एम.आय.डी.सी.वाहिनी दुरूस्त करण्यासाठी सकाळचे ६ वाजले. नंतर ११ केव्ही फिडरची दुरूस्ती कार्याला सुरूवात झाल्यानंतर ११ केव्ही चवरे नगर वाहिनीचे ६ स्पॅन क्षतीग्रस्त झाल्याने व १२ स्पॅन लघूदाब वाहिनीचे क्षतीग्रस्त होऊन खंडित झालेला वीज पुरवठा व ११ केव्ही लक्ष्मी फिडरचा खंडित झालेला वीज पुरवठा मध्यरात्री ३;४० वाजता पुर्ववत करण्यात आला.११ केव्ही कनवार,११ केव्ही मोती नगर,११ केव्ही माधवी वाहिनीचा खंडित वीज पुरवठा सकाळी ७:१५ वाजता पुर्ववत करण्यात महावितरण कर्मचाऱ्यांना यश आले. ८० टक्क्यापेक्षा जास्त भागाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात दुपार १ वाजेपर्यंत महावितरणला यश आले आहे.
मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी हे सर्व परिस्थितीची लक्ष ठेवले असून अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे व कार्यकारी अभियंता आनंद काटकर वीज दुरूस्ती कार्याला गती देण्यासाठी फिल्डवर उपस्थित आहे.
मध्यरात्री पोल टू पोल पेट्रोलींग
वादळ- वाऱ्यामुळे खंडित झालेला वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी महावितरणला पोल टू पोल पेट्रोलींग करावी लागते आणि वीज वाहिन्यावरील अडथळे काढावे लागते.त्यामुळे काल मध्यरात्री अनेक ठिकाणचे वीज वाहिन्यावर पडलेली झाडे काढण्यात आली.
बॅकफिडींगने पर्यायी वाहिन्यांचा वापर
शहरात ५० पेक्षा जास्त लघूदाबाचे व ३२ पोल ११ केव्हीचे व ३ पोल ३३ केव्हीचे तुटले आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी बॅकफिडींगने म्हणजेच पर्यायी यंत्रणेचा वापर करत वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे.
अतीरिक्त मुणुष्य बळाचा वापर
जिल्ह्यात मुसळधार पावसासह वादळाची व्याप्ती जास्त आहे. अनेक वीज खांब,वाहिन्या क्षतीग्रस्त झाल्या आहेत.त्यामुळे विस्कळीत यंत्रणा पुर्ववत करण्यासाठी अतीरिक्त मणुष्यबळ, तैनात करण्यात आले आहेत.
_*ग्राहकांसाठी संपर्क यंत्रणा कार्यरत*_
महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहे.वीज पुरवठा सुरळीत करतांना सुरूवातीला ३३ केव्ही,नंतर ११ केव्ही आणि नंतर फ्युजकॉल आणि वयक्तिक तक्रारी सोडविण्याला प्राधान्य देण्यात येते आहे.परंतू शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना तक्रार दाखल करण्यासाठी आपात्कालीन परिस्थितीत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आणि २४ तास सुरू असणाऱ्या दैनंदिन संनियंत्रण कक्षाच्या ७८७५७६३८७३ हे मोबाईल नंबरवर कॉल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
@ विदर्भ प्रजासत्ताक वेब न्यूज
आमच्या वेब न्यूज पोर्टल ला जॉईन व्हा व वाचा प्रत्येक अपडेट सर्वात आधी