6 मे ला दुपार नंतर होणारा अमरावती,बडनेरा शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद
नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करण्याचे मजीप्राचे आवाहन
दि4 वि.प्रजासत्ताक अमरावती
अमरावती पाणी पुरवठा योजने अंतर्गत सिंभोरा येथील ९०० अश्वशक्ती व्ही. टी. पंपाच्या दुरुस्तीचे काम दिनांक ६ मे २०२३ रोजी करण्यात येत आहे. त्यामुळे अमरावती व बडनेरा शहराला दुपार नंतर होणार पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाणी पुरवठ्या बाबत गैर सोय उद्भवू नये, म्ह्णून नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा, व पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता अजय लोखंडे यांनी केले आहे.