आरोग्य शिबीरात प्रत्येकाने आपली शारीरिक व्याधी तपासणे गरजेचे – आमदार प्रताप अडसड
दि13वि.प्रजासत्ताक चां.रेल्वे
निरोगी शरीर हिच खरी माणसांची संपत्ती आहे. लोकं आयुष्यभर काबाडकष्ट करुन पैसे मिळवतात, मात्र हा पैसा मिळवितांना ते आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे बहुतांशी जणांना साधारण वयाच्या चाळीशी नंतर विविध शारीरीक व्याधी सतावत असतात. त्यावर वेळीच उपचार न झाल्यास त्या व्याधी अधिक बळावतात. त्यामुळे अशा प्रकारच्या आरोग्य शिबीरात प्रत्येकाने सहभागी होवुन आपली शारीरिक व्याधी तपासणे गरजेचे आहे, यामुळे भविष्यात उद्भवणार्या व्याधींपासुन आपली सुटका होवु शकते. या शिबिरातून रुग्णांना निश्चित फायदा होईल असे प्रतिपादन आमदार प्रताप अडसड यांनी व्यक्त केले.
सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व अरुणभाऊ अडसड बहुउद्देशीय संस्था, धामणगाव रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क रोग निदान शस्त्रक्रिया, उपचार व औषधी वाटप शिबिराचे आयोजन शनिवारी चांदूर रेल्वे येथील संताबाई यादव मंगल कार्यालयात करण्यात आले होते. याला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. बाराशे रुग्णाची मोफत तपासणी करण्यात आली तर यात ज्या रुग्णांना आजारांवर शस्त्रक्रिया ची गरज आहे अशा दोनशे रुग्णांना सावंगी मेघे येथे पाठवण्यात येणार आहे
सदर उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रताप अडसड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पं. स. सभापती प्रशांत भेंडे, आचार्य विनोबा भावे रूग्णालयाचे संचालक डॉ. अभय मुडे, मेघे ग्रुपचे पीआरओ नानाजी शिंगणे, डॉ. अभिषेक जोशी, भाजपा तालुकाध्यक्ष संजय पुनसे, शहराध्यक्ष बंडू भुते, डॉ. वसंतराव खंडार, डॉ. अर्चना रोठे (अडसड), डॉ. सुषमा खंडार, कृउबास संचालक आशुतोष (पप्पू) गुल्हाणे, माजी न. प. उपाध्यक्ष प्रसन्ना पाटील, रवी उपाध्ये आदींची मंचावर उपस्थिती होती. आमदार प्रताप अडसड यांच्यासह मंचावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचलन अजय हजारे व आभार प्रदर्शन सचिन होले यांनी केले. सदर शिबिरात मेडिसिन तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, सर्जरीतज्ञ, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, श्वसन रोग तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, मानसिक रोग तज्ञ, न्युरो तज्ञ, दंत व मुखरोग तज्ञ, युरो तज्ञ आदी तज्ञ डॉक्टर चमु उपस्थित होते. त्यांनी रूग्णांच्या विविध आजारांची तपासणी केली. महिलांच्या तपासणीसाठी महिला स्टाफ ची व्यवस्था करण्यात होती. तसेच महिलांसाठी खास दोन स्पेशल मोबाईल व्हॅन व स्पेशल टीम सुध्दा होती. हृदयरोग तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून इसीजी मशीनद्वारे करण्यात आली व कॅन्सरची तपासणी सुद्धा करण्यात आली. आवश्यक असल्यास रुग्णांचे पुढील उपचार विनोबा भावे रुग्णालयात करण्यात येणार आहे. या संपुर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सचिन होले, अखिलेश पोळ, छोटू देशमुख, समिर भेंडे, बच्चू वानरे, अमोल देशमुख, अजय हजारे, विलास तांडेकर, सुरेखा तांडेकर, विजय मिसाळ, रोशन सरदार, सचिन जयस्वाल, मंगेश भोसले, मुरलीधर मुंधडा, संदीप सोळंके, पंजाब राऊत, किशोर क्षिरसागर, प्रमोद राऊत, धिरेंद्र खेरडे, राजु चौधरी, मुरलीधर दुधाट, अमोल आखरे, सुरज चौधरी, दिनेश सावंत, नंदा वाधवानी, सुधाकर धामणकर तसेच भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा, महिला आघाडी, अल्पसंख्यांक सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
६६ आशावर्कर चा काढला विमा
अल्प मानधनात कार्य करीत असलेल्या चांदूर रेल्वे तालुक्यातील ६६ आशावर्कर यांचा आ प्रताप अडसड यांच्यातर्फे प्रत्येकी १ लाख १५ हजार रूपयांची विमा पॉलीसी काढण्यात आली असुन त्याचे वाटप सुध्दा आ. प्रताप अडसड यांच्याहस्ते करण्यात आले. सदर पॉलीसीचे दरवर्षी रिन्युवल स्वतःकरणार आहो असे आ. अडसड यांनी सांगितले