जिल्हा मध्यवर्ती बँकेत आता शेतकरी व कर्मचाऱ्यांंकरिता आता वाहन कर्जाची सुविधा
उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी वाहनाची चावी देऊन केला अमलबजावणीला प्रारंभ
विदर्भ प्रजासत्ताक
अमरावती,
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने आता कृषी आणि गृह कर्जासोबतच शेतकरी व पगारदार कर्मचाऱ्यांकरिता वाहन कर्जाची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, या वाहन कर्जाची अंमलबजावणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी लाभार्थ्यांना चाबी देऊन केला .
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार बच्चू कडू व उपाध्यक्षपदी अभिजीत ढेपे यांनी बँकेची सत्ता घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये शेतकरी व कर्मचाऱ्यांकरिता अनेक सुविधा दिल्या जात आहे ,यापूर्वी शेतकऱ्यांकरिता गृह कर्ज योजना देखील सुरू करण्यात आली आहे, सोबतच कर्मचाऱ्यांच्या पगारात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे, यात भर म्हणून आता शेतकरी व पगारदार कर्मचाऱ्यांंकरिता चार चाकी वाहन कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी वाहनाची चावी देऊन या योजनेला योजनेचा प्रारंभ केला , या उपक्रमाचे पहिले लाभार्थी, नांदगाव पेठ येथील उर्दू हायस्कूल मधील मुख्याध्यापक जकाऊल्ला खान यांनी या जिल्हा बँकेतून चार चाकी वाहना करता कर्ज घेऊन वाहन खरेदी केलेले आहे, याप्रसंगी यांना बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांच्या हस्ते कारची चावी देण्यात आली, त्यावेळी बँकेचे संचालक अजय मेहकर व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डब्ल्यू बकाल ,बँकेचे मुख्य कर्जाधिकारी के. एन. काकडे व बँकेचे प्रशासन अधिकारी एस. एस इंगळे उपस्थित होते.
@विदर्भ प्रजासत्ताक