मध्यवर्ती बस स्थानकात चालक-वाहकांसाठी विश्रामगृहाच्या छताचा भाग रात्री अचानक कोसळला
सुदैवाने जिवीत हानी नाही
दि.५विदर्भ प्रजासत्ताक
अमरावती
अमरावती मध्यवर्ती बस स्थानकात चालक-वाहकांसाठी विश्रामगृह असलेल्या छताचा काही भाग काळ मध्यरात्री च्या सुमारास अचानक पडल्याने विश्राम करत असलेल्या वाहक चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पडलेल्या छतामुळे कोणी वाहक चालक जखमी झाले नसले तरी रात्री मात्र बसस्थानकात चांगलीच खळबळ माजली होती.
अमरावती मध्यवर्ती बस स्थानकात रात्री मुक्कामी असलेल्या एसटी बसेच चे चालक – वाहक हे विश्रांती साठी मध्यवर्ती बस स्थानकाच्या विश्राम गृहात रात्रीला आराम करतात तर अमरावती मध्यवर्ती बस्थानकाची जीर्ण झालेली इमारतिचे आयुर्मान संपलेले आहे तरी नाईलाजास्तव चालक वाहक याठिकाणी रात्रीला आराम करतात.सोमवारी रात्री काही चालक – वाहक रात्री निद्रा अवस्थेत असताना विश्राम गृहाच्या छताचा एक भाग खाली पडला व काही काळासाठी या ठिकाणी गोधंळ उडाला त्यानंतर या वाहक चालकांनी जीव मुठीत धरून रात्र कशी बशी जागून काढली. जीर्ण झालेल्या या इमारतीची अनेक वेळा थातुर मातुर डागडुजी करण्यात आली आहे मात्र त्याचा काहीही उपयोग होत नाही तर कुण्या एका चालक – वाचकाचा जीव गेल्यावर विभाग नियंत्रक कार्यालयाला जाग येईल असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
मध्यवर्ती बसस्थानकाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीला ४९ वर्षे झाली. दिवसेंदिवस प्रवाशांची वाढती संख्या व अन्य अडचणी लक्षात घेता एसटीच्या विभागीय नियंत्रक कार्यालयाने याठिकाणी नवीन इमारत बांधकामासाठी सुमारे १५ कोटी २१ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. मात्र, या निधीत बसस्थानकाचे नव्याने बांधकाम पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे विभाग नियंत्रक कार्यालयाने वरिष्ठस्तरावर २५ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव सादर केला आहे.मात्र तो धूळ खात पडलेला असल्याची माहिती आहे.
@ विदर्भ प्रजासत्ताक