आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेट ‘जैसे थे’, कर्जधारकांना दिलासा!
@ विदर्भ प्रजासत्ताक
आरबीआयने यंदाच्या आर्थिक वर्षातलं पहिलं पतधोरण जाहीर केलं आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे. यंदादेखील रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. आरबीआयकडून रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. याआधी फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो रेटमध्ये शेवटची वाढ करण्यात आली होती.
चालू आर्थिक वर्षाचे धोरण ठरवण्यासाठी आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक झाली. या बैठकीला 3 एप्रिल रोजी सुरुवात झाली होती. आज म्हणजेच 5 एप्रिल रोजी या बैठकीचा शेवटचा दिवस होता. बैठक संपल्यानंतर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन चलनविषक धोरणाविषयी माहिती दिली. त्यांनी दिलेल्य माहितीनुसार यावेळीदेखील आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही.