असा कोणताही निर्णय नाही, ती केवळ अफवा- राकॉ नेता संजय खोडके
दि.२३ विदर्भ प्रजासत्ताक
राष्ट्रवादी काँग्रेस चे नेता संजय खोडके यांची राज्यपाल नामीत १२ विधान परिषद सदस्य मध्ये वर्णी लागणार आहे.व ते येत्या २ जुलै रोजी नामांकन दाखल करतील अशा आशयाच्या बातम्या माध्यमांमधून पसरविण्यात येत आहे. परंतु या बाबत असा कुठलाही निर्णय झाला नसून ही केवळ अफवा पसरविली जात आहे. यावर कोणीही विश्वास ठेवू नका,असा जाहीर खुलासा राकॉ नेता संजय खोडके यांनी केला आहे. या संदर्भातील मॅसेज सुद्धा सोशल मीडियावरून प्रसारित वा वायरल करू नये, असे नम्र आवाहन सुद्धा संजय खोडके यांनी केले आहे.
ताज्या बातम्यांचे अपडेट सर्वात आधी वाचण्यासाठी रहा आमच्या सोबत