केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत काय म्हणाले अमरावती शहरातील राजकीय नेते ……
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली – यशोमती ठाकुर
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२३अमरावती
महाराष्ट्र राज्यातून सर्वात जास्त कराच्या रूपातून पैसा केंद्र सरकारला जात असताना त्याचा परतावा मात्र होताना दिसत नाही. केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसली आहेत, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि आमदार ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना या अर्थसंकल्पात भरभरून तरतूद केली आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या उपकारांची परतफेड करताना महाराष्ट्रासारख्या राज्यांकडे मात्र पाठ फिरवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे एनडीएतील महत्त्व कमी झाले, त्यांची दखल घेतली जात नाही हे यावरून स्पष्ट होते. महिला आणि मुलींसाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा केवळ आभासी घोषणा केल्या आहेत
तरुणांना केवळ एक वर्षासाठी इंटर्नशिपचे गाजर दिले आहे, याने मूळ बेरोजगारीची समस्या कमी होणार नाही. असेही ॲड ठाकूर म्हणाल्या. केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पात काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील काही गोष्टी उचलल्या असल्याचे दिसते, मात्र काँग्रेसची विकासाची दृष्टी ही घेतली असती तर बरं झालं असतं. असा टोलाही ॲड. ठाकूर यांनी लगावला.
————————————————
गरीब, शेतकरी, युवक व महिलांना समर्पित असलेला अर्थसंकल्प – डॉ. अनिल बोंडे
प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केला. गरीब, शेतकरी, युवा व महिलांना समर्पित असलेला हा अर्थसंकल्प आहे. विकसित भारताच्या निर्माणाकरीता नऊ प्राधान्य यामध्ये विषद केले आहे. सर्वांना दिलासा देणारा आणि विकसित भारताचा अर्थसंकल्प निर्मला सितारामन यांनी मांडला असून या अर्थसंकल्पाचे स्वागत असल्याची प्रतिक्रिया राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.
————————————————
सर्वसमावेशक, सर्वजनहिताय, सर्वजनसुखाय अर्थसंकल्प
चेतन गावंडे (माजी महापौर)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून विकसित भारताला चालना देणारा वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना प्राधान्य देत त्यांच्या विकासासाठी पुरेशा संधी निर्माण करण्यासाठी नऊ बिंदूच्या प्राधान्यक्रमांकवर भर देण्यात आला आहे . शेतीमध्ये उत्पादकता आणि लवचिकपणा , रोजगार आणि कौशल्ये, सर्वसमावेशक मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय , उत्पादन आणि सेवा , शहरी विकास, नागरी विकास , ऊर्जा सुरक्षा , पायाभूत सुविधा , नवोपक्रम, संशोधन आणि विकास , पुढच्या पिढीसाठी सुधारणा इ बाबाचा अंतर्भाव करण्यात आला .
केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमन यांनी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आणि प्रगतीशील असून यात युवा, शेतकरी, दुर्बल, महिला अशा विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हा अर्थसंकल्प एक नवीन इतिहास तयार करणारा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विकसित भारताचं स्वप्न साकारण्याच्या आणि गरिबकल्याणाचा उद्देश साध्य करण्याच्या दिशेने जाणारा हा अर्थसंकल्प भारतातील जनतेच्या आशा-आकांक्षांना बळ देणारा आहे.
सर्वसमावेशक अर्थसंकल्पाबद्दल सरकारचे अभिनंदन !
———————————————-
अर्थसंकल्पात महाराष्ट्राकडे दुर्लक्ष –
सुनील खराटे
शिवसेना जिल्हाप्रमुख
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद करेल अशी आशा होती .परंतु ती आशा फोल ठरली आहे. बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी अर्थसंकल्पात मोठे पॅकेज जाहीर करण्यात आले. पण त्या तुलनेत महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करण्यात आले असून केवळ मन लुभावन असा घोषणा करण्याचा फार्स केंद्र सरकारने अर्थसंकल्पात केल्याचे दिसून येते .सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा मिळेल अशी कुठलीही घोषणा करण्यात आली नाही .शेतकरी, उद्योग, शिक्षण, रोजगार आदी क्षेत्रांसाठी कोटीची उडाने करणारे आकडे अर्थसंकल्पात मांडण्यात आले असले तरी प्रत्यक्षात त्याचा फायदा मिळण्याची शक्यता नाही.
————————————————
करदात्यांची निराशा करणारा अर्थसंकल्प
देशातील एनडीए सरकार अर्थसंकल्पातुन कर रचनेत मोठे बदल करणार अशी अपेक्षा करदात्यांना होती. पण केवळ त्रुटक बदल करीत तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न करण्यात आला असून 15 लाखाच्या वर उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कुठलाही रिलीफ देण्यात आला नाही. मुद्रा लोनची मर्यादा वाढविणे, बेरोजगार युवकांना स्टायफंड अश्या विविध घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आल्या असल्या तरी एकंदरीत करदात्यांचा निराशा करणारा हा अर्थसंकल्प आहे
अमोल चवणें (पासपोर्ट)
उद्योजक अमरावती
—————————————————————————————————-
देशाला वेगवान बनविणारा अर्थसंकल्प- निवेदिता चौधरी
कोरोनामुळे जगातील अनेक प्रगत देशांच्या अर्थवव्यवस्थेचा विकास दर माघारला असतांना देशाच्या अर्थव्यवस्थेने 8.2 टक्के वाढ दाखविली आहे. देशाला वेगवान बनविणारा अर्थसंकल्प आहे.केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात तरुणांना इंटर्नशिप, महिला आणि मुलींसाठी: महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद. ज्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही त्यांना देशभरातील संस्थांमध्ये प्रवेशासाठी कर्ज मिळेल. सरकार कर्जाच्या 3 टक्के रक्कम देईल. यासाठी ई-व्हाऊचर सुरू केले जातील, जे दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना दिले जातील.आयकर स्लॅबमध्ये बदल केले आहे.शेतकरी,कष्टकरी यांच्यासह सर्वानाच फायदेशिर ठरणारा हा केंद्रिय अर्थसंकल्प आहे
निवेदिता चौधरी-भाजपा नेत्या
कोरोनामुळे जगातील अनेक प्रगत देशांच्या अर्थवव्यवस्थेचा विकास दर माघारला असतांना देशाच्या अर्थव्यवस्थेने 8.2 टक्के वाढ दाखविली आहे. देशाला वेगवान बनविणारा अर्थसंकल्प आहे.केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात तरुणांना इंटर्नशिप, महिला आणि मुलींसाठी: महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद. ज्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही त्यांना देशभरातील संस्थांमध्ये प्रवेशासाठी कर्ज मिळेल. सरकार कर्जाच्या 3 टक्के रक्कम देईल. यासाठी ई-व्हाऊचर सुरू केले जातील, जे दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना दिले जातील.आयकर स्लॅबमध्ये बदल केले आहे.शेतकरी,कष्टकरी यांच्यासह सर्वानाच फायदेशिर ठरणारा हा केंद्रिय अर्थसंकल्प आहे
निवेदिता चौधरी-भाजपा नेत्या
——————————————————–
हा नक्की भारताचा अर्थसंकल्प आहे का ?
केंद्रात आपले सरकार टिकविण्यासाठी या सरकारने महाराष्ट्र आणि अन्य महत्त्वाच्या राज्यांवर अवकृपा दाखवत केवळ आंध्र प्रदेश आणि बिहारवर बजेटची उधळण केली आहे. महाराष्ट्र राज्य सर्वाधिक कर देणारे राज्य असून देखील महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही मिळालेले दिसत नाही. इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात असलेले बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता देण्याची काही अंशी कॉपी केलेली दिसते. मात्र युवकांना इंटर्नशिप कशी आणि कोण देणार यात स्पष्टता नाही. शिक्षण आणि क्रीडा या सारख्या महत्त्वाच्या विषयात देखील कोणताही चांगला निर्णय दिसून हे नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला तर पाने पुसणाराच हा अर्थसंकल्प आहे.
सागर देशमुख