
शिवसेना तालुकाप्रमुखआशिष धर्माळे यांचा बडनेरा मतदारसंघात जनसंपर्क वाढविला
@ विदर्भ प्रजासत्ताक
बडनेरा
बडनेरा मतदार संघात शिवसेनेचे निष्ठावंत, शिवसेना तालुकाप्रमुख माजी प.स. सभापती आशिष धर्माळे यांनी बडनेरा मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटा कडे निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली असून बडनेरा मतदारसंघात जनसंपर्क अभियानाला सुरुवात केली आहे. त्यांच्या या अभियानाला नागरिक हि प्रतिसाद देत आहे
शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख अशीष धर्माळे यांनी बडनेरा मतदार संघात जनसंपर्क अभियान आणि प्रचारात आघाडी घेतली असून मंगळवारी धर्माळे यांनी बडनेरा मतदारसंघातील
काट आमला, उत्तमसरा या ग्रामीण भागात जाऊन शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटी दिल्या. तसेच येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकी सह, मतदार संघ आणि गावातील रखडलेल्या विकास कामाबाबत माहिती जाणून घेतली या वेळी ग्रामीण भागातील नागरिकांनी आशिष धर्माळे यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. बडनेरा मतदार संघात विद्यमान आमदार रवी राणा आहेत त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आता कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.