आमदार राणांनी केली विसर्जन स्थळांची पाहणी
अमरावती
आमदार रवी राणा यांनी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्यासह आज छत्री तलाव,प्रथमेश,वडाळी,कोंडेश्वर तसेच झिरी दत्त मंदिर विसर्जन स्थळांची पाहणी, मंडळाचे तसेच घरगुती श्री गणेश मूर्ती विसर्जन शांततेने व सुरळीतपणे व्हावे यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश हि दिलेत.
संपूर्ण राज्यात गणेशोत्सव अत्यन्त उत्साहात साजरा होत आहे,गणेश विसर्जन हे अत्यंत चांगल्या पद्धतीने नागरिकांना त्रास न होता,कुठलीही दुर्घटना न होता व्हावे यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच या सर्व स्थळाकडे जाणारे रस्ते चांगले करावे,प्रकाश व्यवस्था चांगली असावी,आरोग्य चमू तैनात असावी,अग्निशमन दल, सुरक्षा यंत्रणा सज्ज असावी, तसेच नागरिकांना सूचना देण्यासाठी लाऊडस्पीकर ची व्यवस्था असावी अश्या सूचना आमदार रवी राणा यांनी दिल्या, तसेच पोलीस यंत्रणेला वाहतूक नियोजन योग्य पध्दतीने करण्याचे निर्देश आमदार रवी राणा यांनी दिले
*यावेळी आमदार रवी राणा यांच्या समवेत मनपा आयुक्त सचिन कलंत्रे,डीसीपी गणेश शिंदे,सहायक उपायुक्त नरेंद्र वानखडे,मनपा दस्तुर नगर झोनचे श्री बोबडे, सहायक झोन श्री तीखीले, सहायक आयुक्त गायकवाड मॅडम, अतिक्रमण विभागाचे श्री कोल्हे,श्री हडाले,नितीन बोरेकर,अग्निशमन कर्मचारी आदी सह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते