
जयकुमार बेलखडे यांचा बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार पक्षात प्रवेश..
वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा निवडणुक प्रहार पक्षाकडून लढणार
अमरावती
वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभेतील स्वराज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयकुमार बेलखडे यांनी आज आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह प्रहार पक्षात प्रवेश भेट घेतला आहे,जयकुमार बेलखडे हे प्रहार पक्षाकडून आर्वी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे, जयकुमार बेलखडे यांनी स्वराज्य शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आर्वी विधानसभेत मोठे संघटन निर्माण केले आहे गेल्या महिन्यापूर्वी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती त्यानुसार ते मनसे पक्ष्यात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते मात्र आज त्यांनी कार्यकर्त्यांसह बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णा येथील निवासस्थानी प्रहार पक्षात प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ताज्या बातम्यांचे अपडेट सर्वात प्रथम वाचा आमच्या सोबत @विदर्भ प्रजासत्ताक