व्वा मानलं गुरुजी!
बँड… बाजा…आणि मिरवणूक
राज्य व जिल्हा आदर्श पुरस्कार घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी केला हटके सत्कार
कायम स्मरणात राहील असा सत्कार समारंभ
धामणगाव रेल्वे,
प्रत्येकाच्या जीवनाचा स्तर सुधारण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. कारण चांगल्या-वाईट गोष्टींचा विचार करण्याची क्षमता आई-वडिलांनंतर शिक्षकच विकसित करतात. त्यामुळे गुरूंविषयी सगळे आदर व्यक्त करत असतात. विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी नुकताच राज्य पुरस्कार व जिल्हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर आपल्या गुरूंचा केलेला सन्मान संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
धामणगाव पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा कासारखेडा येथील श्रीकृष्ण चव्हाण यांना यावर्षी जिल्हा तथा राज्याचा आदर्श असा दुहेरी सन्मान मिळाला. यानिमित्ताने श्रीकृष्ण चव्हाण यांची मिरवणूक काढून त्यांना विद्यार्थिनी आणि ग्रामस्थांनी आगळावेगळा सत्कार केला.शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील ऋणानुबंध वेगळेच असतात. अनेक वर्षे शिक्षक आणि विद्यार्थी यांचा एकमेकांशी परिचय असतो. आपल्या शिक्षकाने कमावलेले नाव-लौकिक पाहून गावकऱ्यांना अभिमान वाटत असतो. तर, विद्यार्थ्यांनाही शिक्षकांबाबत खूप आदर असतो. विद्यार्थी आणि शिक्षकांमधील ऋणानुबंध दर्शवणारी एक घटना कासारखेडा येथे घडली आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकाची चक्क गावातून मिरवणूक काढत हटके सत्कार केला आहे. विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा त्यांच्याबद्दल खूपच जिव्हाळा निर्माण झाला आहे.श्रीकृष्ण चव्हाण हे सगळ्या विद्यार्थ्यांना हवेहवेसे वाटणारे, असे एक शिक्षक. यांनी शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे आणि चोख कर्तव्य बजावलेल्या या शिक्षकाप्रती आभार व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत गावातल्या लोकांनी अनोखी मिरवणूक काढली.
या आगळ्या वेगळ्या सत्कार सोहळ्याच्या मिरवणुकीत पंचायत समिती सदस्य शुभम भोंगे,सरपंच नीलिमा पांडे,उपसरपंच शुभमजी तरोने,सदस्य प्रदीप वाघमारे,ग्रामसेवक श्री लोडाम,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीनजी येलेकार,उपाध्यक्ष शरद कामटकार,सदस्य प्रवीण पांडे,विजय ठावरे,नितेश मगर,मनीषा ठावरे,प्रणिता पांडे,पोलीस पाटील श्री दाऊतपुरे,गावातील श्री चांडक,श्री सोनवणे,रोशन मेंढूले,श्री वैद्य,रोशन पांडे,किशोर सांगोडे,नितीन नवघरे, वैभव तरोने,श्याम वैद्य, आकाश राऊत, प्रज्वल चरडे,धनंजय डोळे, शंतनू मेंढुले, विशाल तरोने,वैभव राऊत, नितीन वाघाडे,संकेत वैद्य,अभी तरोने,शिक्षिका संध्या
देशमुख,किशोर परतेकी,ओमप्रकाश धनुस्कार,श्रीमती मून,अंगणवाडी सेविका श्रीमती गायकवाड,श्रीमती पुसदेकर व आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
हा माझा सत्कार नसून विद्यार्थ्यांचा सत्कार आहे.हा सत्कार मी विद्यार्थ्यांच्या चरणी समर्पित करीत आहे.
श्रीकृष्ण चव्हाण,मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा कासारखेड
——-
ताज्या बातम्यांचे अपडेट सर्वात प्रथम वाचा आमच्या सोबत @विदर्भ प्रजासत्ताक