शिवसेना पक्ष चिन्ह अन् नावाबद्दल सुनावणी पुन्हा लांबली:सुप्रीम कोर्टात 21 ऑक्टोबरला सुनावणी होणार
विदर्भ प्रजासत्ताक
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्याया लयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे. यावर 17 सप्टेंबरला सुनावणी होणार होती. मात्र आता ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली असून आता सुप्रीम कोर्टात 21 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या फुटीनंतर सर्वोच्च न्यायालयात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत. या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्याची विनंती उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाने केली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे.
यापूर्वी सुनावणी दोन आठवड्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आली होती. ही सुनावणी आज होणार असल्याचे समोर आले होते. आता निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर 21 ऑक्टोबरला आता सुनावणी होईल.