शेतकरी कन्येची उत्तुंग भरारी.. बँकेत कॅशियर पदी निवड
श्री.शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्याल अकोट येथील ऑडिटोरियम हॉल येथे प्लेसमेंट कमिटी, राज्यशास्त्र विभाग आणि आय.सी.आय.सी.आय बँक यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये बि.ए, बि.कॉम, बि.एस.सी, एम.ए, एम.कॉम, एम.एस.सी, पदवी उत्तीर्ण असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी
सहभाग नोंदविला होता. त्याद्वारे घेण्यात आलेल्या परिक्षा व मुलाखतीमध्ये महाविद्यालयातील बि.कॉम.अंतिम वर्षाची विद्यार्थीनी तसेच अकोट तालुक्यातील मक्रमपुर या छोट्याश्या गावातील शेतकरी गजानन गोविंदराव लोनकर यांची कन्या कु.तेजस्विनी गजानन लोनकर हि उत्तीर्ण झाली असुन, तिची आय.सी.सी.आय बँक शाखा काटोल येथे कॅशियर पदि नियुक्ति करण्यात आली आहे. कु.तेजस्विनी ही एक उत्कृष्ट प्रवक्ता सुद्धा असुन तिने वक्तृत्व स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिके पटकावीले आहेत.
कु.तेजस्विनी हिच्या नियुक्तीमुळे तिच्यावर अकोट तालुक्यातील समस्त स्थरावरुन अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. या औचित्यावर श्री. शिवाजी महाविद्यालय अकोटचे प्राचार्य डॉ.सुनील पांडे यांनी तिचे व तिच्या वडीलांचे अभिनंदन करित पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयामध्ये सत्कार केला व तिला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. तिने आपल्या यशाचे श्रेय तिचे मार्गदर्शक व शिक्षक प्रा. सुरेंद्र देशमुख सर व तिच्या आई- वडिलांना दिले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थीनी प्रामुख्याने उपस्थित होते.