मेळघाटच्या चिखलदऱ्यांमधील जांमली आर गावात खा.अनिल बोंडे यांनी दिली भेट…
उपचाराधीण रुग्णांची केली चौकशी
मृत नागरिकांच्या घरी दिली सांत्वनपर भेट
चिखलदरा :
चिखलदरा तालुक्यातील जांमली आर गावात गेल्या आठवड्यापासून सात रोगाचे थैमान पसरले आहे. या ठिकाणी आज राज्यसभा सदस्य अनिल बोंडे यांनी भेट देत उपचाराधीन असलेल्या रुग्णांची चौकशी केली व त्यांना पूर्ण क्षमतेने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या.
जामली यार गावात सात रोगाचे थैमान वाढल्याने जलजन्य व किटकजन्य आजारांमुळे काही रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. एकूण दहा रुग्णांपैकी सहा रुग्णांचा मृत्यू हा वृद्ध काळाने झाला होता तर जणांचा मृत्यू हा अतिसाराची लागण झाल्यामुळे झाल्याचे पुढे आलं होत. त्यानंतर तातडीने राज्यसभा सदस्य डॉ.अनिल बोंडे यांनी जांमली आर गावात धडक देत जिल्हा परिषद शाळेत आरोग्य विभागाने उभारलेल्या अस्थाई रुग्णालयाला भेट दिली. या ठिकाणी सध्या सहा रुग्ण उपचाराधीन आहेत. डेंग्यूने बाधित असलेल्या सहा रुग्णांना आरोग्य विभागाने पूर्ण क्षमतेने व चांगले वैद्यकीय उपचार द्यावे, अशा सूचना त्यांनी चिखलदऱ्याचे तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चंदन पिंपळकर व धारणीच्या डॉ.तिलोत्तमा वानखडे यांना दिल्या. तसेच उपचार घेत असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची त्यांनी आस्थेने विचारपूस केली. यावेळी मेळघाटचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, केवलराम काळे, भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष मोहन जाजोदिया, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन खडके, माजी तालुकाध्यक्ष दिनेश चव्हाण, सरपंच सुशीला भूसूम, गंगाराम गायन, मुन्ना उमरकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जल जीवन मिशनची कामे निकृष्ठ दर्जाची
जामली आर गावात जल जीवन मिशन मार्फत पाईपलाईन अंथरण्याचे काम करण्यात आले आहे. सदर पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अनिल बोंडे यांनी संताप व्यक्त केला. तसेच निकृष्ट पाईपलाईनच्या कामांची चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. पाईपलाईन लिकेज झाल्याने गावात दूषित पाण्याचा पुरवठा झाला व त्यातूनच जलजन्य आजारांची नागरिकांना लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
मृतक कुटुंबीयांप्रती व्यक्त केल्या सांत्वना
जामली आर गावात वृद्धापकाळाने 6 नागरिकांचा मृत्यू देखील झाल्याचे समोर आलं होतं. त्यांच्या घरी डॉ.अनिल बोंडे यांनी भेट देत त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. तसेच मृतक कुटुंबीयांच्या दुःखात भाजप पूर्णपणे सहभागी असून सर्वतोपरी मदत शासनाकडून मिळवून देण्यासाठी तत्पर असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केलं.