स्वामी समर्थ सेवा केंद्र रहाटगाव येथे भागवत कथेचे आयोजन.
प.पूज्य श्री जयनारायण शास्त्रीजी महाराज यांच्या सुमधुरवाणीतून भागवत कथेचा भाविकांना मिळणार लाभ.
अमरावती-
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र रहाटगाव येथे भागवत कथेचे आयोजन परमपूज्य श्री जय नारायण शास्त्रीजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून भागवत कथेचे १९ सप्टेंबर पासून आयोजन करण्यात आले आहे.नैमिश्यारण्य धाम व्यासांची गादी असलेले नैमिश्यारण्य ही ऋषीमुनींची तपश्चर्या भूमी आहे याच ठिकाणी महर्षी व्यासांनी गणपती कडून महाभारत नैमिश्यारण्य येथून लिहून घेतले या पवित्र क्षेत्रातील कथावाचक यांच्या सुमधुरवाणीतून पितृ मोक्षाच्या पर्वावर भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून ही कथा दिनांक १९ सप्टेंबर गुरुवार रोजी सुरू होऊन याची सांगता बुधवार २५ सप्टेंबर रोजी करण्यात येईल.कथेची वेळ दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे.कथेची सांगता पूर्णाहुती काला व किर्तन तसेच सुदर्शन महायज्ञाने सकाळी 9 वाजता होईल तरी या भागवत कथेचा लाभ भाविकांनी घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र समस्त विश्वस्त मंडळ रहाटगाव यांनी केले आहे .