काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कुणाल चौधरी यांचे उपस्थितीत शहर काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न
शहर काँग्रेस पूर्ण क्षमतेने निवडणुकीला सज्ज
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव महाराष्ट्राचे प्रभारी कुणाल चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीत अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक आढावा बैठक काँग्रेस भवन सभागृहात उत्साहात संपन्न झाली. यानंतर अमरावती विधानसभा व बडनेरा विधानसभे इच्छुक उमेदवारांचे प्रत्यक्ष मत सुद्धा प्रभारी यांनी जाणून घेतले.या वेळी मंचावर खासदार बळवंत वानखडे, माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर,माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख , शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी महापौर विलास इंगोले माजी महापौर मिलिं चीमोटे,अशोकराव डोंगरे,किशोर बोरकर,भैया पवार, बाळासाहेब भुयार, जयश्रीताई वानखडे, हाजी नजीर खान, नसीम खान, निलेश गुहे,वैभव देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
हि बातमी पण नक्की वाचा — मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राजीनाम्याची घोषणा
येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा व संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे प्रभारी श्री कुणाल जी चौधरी यांचा महाराष्ट्र दौऱ्यातील आज अमरावती अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या संघटनेचा आढावा घेण्यात आला. येणारा निवडणुकांना सामोरे जात असताना महाराष्ट्रतील जनतेसोबत दगाबाजी करून असंवैधानिक पद्धतीने सत्तेवर आलेल्या या भाजप प्रणित महायुती सरकारला धडा शिकवण्याकरिता काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता सज्ज झाले पाहिजे त्याचप्रमाणे या महायुती सरकारने राज्यात भ्रष्टाचारी कारभार सुरू आहे याची पोलखोल खऱ्या अर्थाने जनतेमध्ये जाऊन करण्याची वेळ आलेली आहे. या राज्यातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक, माता-भगिनींची सुरक्षा या सर्वच मुद्द्यांवर हे सरकार सपशेल अपयशी ठरलेले आहे. राज्यातील जनता यांना नाकारणार तर आहेच परंतु आता जनतेला निरनिराळी अमिष दाखवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु महाराष्ट्रातील जनता या धोकेबाज सरकारच्या प्रत्येक कृतीकडे बारकाईने लक्ष ठेवून असून या मतपेटीतून धडा शिकवणार असल्याचे प्रतिपादन यावेळी कुणाल चौधरी यांनी केले. यावेळी अमरावती शहरातील संघटनात्मक बाबींचा शहराध्यक्ष श्री बबलू शेखावत यांनी संपूर्ण आढावा सादर केला त्याचप्रमाणे एकजुटीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता जोमाने कार्य करणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.