मेंढपाळांच्या सर्व अडचणी दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – आ. बच्चू कडू
मेंढपाळ बांधवांच्या मेळाव्याप्रचंड प्रतिसाद
अचलपूर
मेंढपाळ बांधवांच्या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेळ्या व मेंढ्यांची मरत होते ही झालेली मरतूक याला शासनाकडून नुकसान भरपाई अनुदान मिळण्यात यावे तथा मेंढपाळ बांधवांच्या मेंढ्यांचे व शेळ्यांचे शासनाकडून एक रुपयात विमा योजना ही पुन्हा सुरू करण्यात यावी
सध्या शेळ्यांमध्ये व मेंढ्यांमध्ये असलेला आजार निमोनिया घटसर्प व सीसीपीपी या रोगामुळे मोठ्या प्रमाणात पशुंचे नुकसान होत आहे त्याकरिता शासनाकडून मागील चार वर्षापासून मागणी असलेला पुरवठा करण्यात यावा हा प्रश्न शासन दरबारी मांडण्यात येणार असल्याचे मत आमदार बच्चू कडू यांनी अचलपूर येथील मेंढपाळ बांधवांच्या मेळाव्यात बोलतांना व्यक्त केले.
भटक्या जमाती व मेंढपाळ धनगर समाजासाठी राज्य सरकार मार्फत विविध योजना राबविल्या जातात .परंतु या संदर्भात योग्य माहिती नसल्यामुळे खरे व गरजू लाभार्थी योजनांपासून वंचित राहतात ,ही बाब लक्षात घेता अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार बच्चू कडू यांनी भटक्या तसेच मेंढपाळ धनगरांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प केला आहे. त्या अनुषंगाने या योजनांची माहिती देण्यासाठी तसेच लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रविवारी १५ सप्टेंबर रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मील कॉलोनी अचलपूर येथील प्रहार कार्यालय येथे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मंढपाळांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये महामेष योजने करता लाभार्थी संख्या खूप असताना उद्दिष्ट मात्र फार थोडे देण्यात आले ही बाब शासन दरबारी रेटण्याकरता जास्तीत जास्त लोकांनी जनजागृती करून ऑनलाइन पद्धतीने महामेष मध्ये अर्ज करणे जेणेकरून शासनाचे हे लक्षात येईल की महामेष योजनेमध्ये लाभार्थ्यांची संख्या जास्त असून योजनेचे उद्दिष्ट वाढवणे आवश्यक आहे त्याकरता लढा उभारण्याकरता ह्या जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आल होते.
राज्यात तथा बाहेर राज्यामध्ये आधुनिक पद्धतीने शेळी व मेंढी पालन कशाप्रकारे केल्या जाते याकरिता मेंढपाळ बांधवांचा एक अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये एक मेंढपाळ बांधवांचा एक गट तयार करून राज्यात व राज्या बाहेर एक अभ्यास दौरा करून तसा अहवाल सादर करण्यात येईल.अचलपूर येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची भरपूर जागा उपलब्ध असताना येथे मेंढपाळ बांधवांसाठी आदर्श असा बंदिस्त शेळी व मेंढी फार्म उभा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे या मागणीला आमदार बच्चू कडू यांनी समर्थन दर्शविलेले आहे लवकरच याबाबत पाठपुरावा करून आदर्श असा बंदिस्त शेळी व मेंढी फार्म उभारण्यात येईल.
मेंढपाळ बांधवांच्या मेळावा करता जवळपास 500 लोकांचा उपस्थिती होती या उपस्थितीमध्ये. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर संजय कावरे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तथा डॉक्टर पुरुषोत्तम सोळंके जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद अमरावती तथा तालुक्यातील सर्व पशु संवर्धन अधिकारी मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित होते या मेळाव्यामध्ये एकाच छताखाली दहा वेगवेगळे योजने करता शेतकऱ्यांकडून फॉर्म भरण्यात आलेले आहे. तथा यानंतरही ही प्रक्रिया दिनांक 26 तारखेपर्यंत सुरळीत राहील असे आयोजकांकडून सांगण्यात आलेले आहे
बाहेर राज्यातील राजस्थानी मेंढ्या या चराई करता आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये येतात त्या येताना भरपूर प्रकारच्या रोगराई घेऊन येतात येताना ते कायमस्वरूपी स्थलांतरित मेंढपाळ कुठलीही लसीकरण जंत निर्मूलन करत नाही त्यामुळे स्थानिक जनावर हे रोगात बळी पडतात व आपल्या स्थानिक जनावरांचा चारा संपवून आपल्या स्थानिक जनावरांना उपासमारीला समोर जावे लागते, त्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी पथदर्शी असा निर्णय घ्यावा अशी मागणी मेंढपाळ बांधवांनी मेळाव्यात बोलून दाखवली.
राष्ट्रीय पशुधन विकास योजनेअंतर्गत सर्वप्रथम चांदूरबाजार तालुक्यात 35 प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते त्यापैकी 21 प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले असून त्यातील 21 प्रकल्प हे मंजूर झालेले आहे. तथा आमदार बच्चू कडू हे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी या योजनेमध्ये जास्तीत जास्त पुढाकार घेऊन राष्ट्रीय पशुधन विकास योजनेसाठी मदत करावी ही एक मुखाने ही मागणी उपस्थित मेनपाळ बांधवांकडून करण्यात आलेली आहे .स्वागताकरता उपस्थित धनगर बांधवांनी आमदार बच्चू कडू यांचे मानाचा दुपट्टा व काठी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आलेले आहे. या मेळाव्याच्या आयोजना करता प्रहार मेंढपाळ पुत्र आर्मी, विशेष प्रयत्न केलेले आहे.