अमरावतीत जुलूस-ए-मोहम्मदी च्या रॅलीत हजारो मुस्लिम बांधवांचा समावेश
अमरावती
मुस्लिम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद-ए-मिलाद आज, इस्लामिक कालगणेप्रमाणे साजरी करण्यात आली त्यासाठी इतवारी बाजार,पठाण चौक हाथीपुरा परिसर सज्ज झाला असून, शहरातून जुलूस-ए-मोहम्मदीचे आयोजन करण्यात आले होते हिरव्या पताका, हिरवे-लाल-पिवळे व नारंगी ध्वज चौकाचौकांत आणि वाहनांवर फडकत असल्याचे दिसून येत आहे.तर या जुलूस मध्ये हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.
शहराच्या हाथीपुरा परिसरात असलेल्या मश्चिदी जवळून या रॅलीला सुरुवात करण्यात आली त्यांनतर हि रॅली नागपुरी गेट परिसरात आल्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत रॅलीचे स्वागत कऱण्यात आले यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सह पोलीस विभागातील अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते त्यानंतर हि रॅली ओसरीया पेट्रोल पंप मार्ग हबीब नगर ,अन्सार नगर, इतवारा बाजार,सक्करसाथ चांदणी चौक ,पठाण चौक ,ताजनगर मार्ग हादरपूर येथील मद्रासीबाबा दर्गाजवळ पोहचली व ठिकाणी देशात सुख शांती व एकोपा रहावा या साठी प्रार्थना करण्यात आली व नंतर या रॅलीचा समारोप कऱण्यात आला.
जुलूस-ए-मोहम्मदी रॅली मध्ये शहरातील राजकीय मान्यवरांसह मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते यानिमित्त संपूर्ण शहर रोषणाईने उजळून निघाले आहे. मुस्लिमबांधवांत उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. रस्त्यांच्या दुतर्फा सजावटीसह चौकाचौकांमध्ये स्वागतकमानी उभारण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी मिठाई व सरबतवाटपासोबत लंगर हि ठेवण्यात आले होते