गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेले तिघे नदीपात्रात गेले वाहून
भातकुली तालुक्यातील पूर्णा नदी परिसरातील घटना
अमरावती
अचलपूर तालुक्यातील ईसापुर शहापूर येथील सार्वजनिक गणेश मंडळात बसविलेल्या गणपती विसर्जनासाठी गेलेले तिघे पूर्णा नदीच्या पात्रात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता वाहून गेल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे रात्री उशिरापर्यंत तिघांचा शोध सुरू होता. यापैकी दोघे काका- पुतणे तर एक इतर व्यक्ती आहे.
मिळालेल्या माहिती नुसार अचलपूर तालुक्यातील ईसापुर शहापूर येथील सार्वजनिक गणेश मंडळात बसविलेल्या गणपती घेऊन विसर्जनासाठी भातकुली तालुक्यातील पूर्णा नदीवर आलेत गणपती विसर्जनाकरिता अमोल ईश्वरदास ठाकरे व मयूर गजानन ठाकरे यांच्या सोबत राजेश संजय पवार हे नदी पात्रात गेले मात्र पाण्याचा अंदाज न आल्या कारणाने हे तिघेही पूर्णा नदी पात्रात वाहून गेले. यातील अमोल आणि मयूर हे काका पुतणे असल्याची माहिती आहे. आज सकाळी रेस्क्यू पथकाने शोध मोहिमे हाती घेतली असता राजेश संजय पवार यांचा मृतदेह १००मीटर अंतरावर मिळून आला उर्वरित दोघांचा शोध आता रेस्क्यू पथक घेत आहे