फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावले
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२० नांदगाव पेठ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते वर्धा वरून अमरावती टेक्सटाईल पार्कचं ई भूमिपूजन झालं.. अमरावती एमआयडीसी याठिकाणी ई कार्यक्रम ठिकाणी भाजप खासदार अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा इतर नेते मंडळी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते यावेळी नवनीत राणा यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळाले.. देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती टेक्सटाईल पार्कसाठी नवनीत राणा यांनी देखील पाठपुरावा केला असा उल्लेख करताच नवनीत राणा ह्या भावुक झाल्या.. यावेळी नवनीत राणाशी बातचीत केली तेव्हा त्या म्हणाल्या की, ते आनंदाचे अश्रू होते…
हि बातमी पण वाचा – काँग्रेस कार्यकर्त्यांनावर गुन्हे दाखल
पीएम मित्रा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अमरावतीमध्ये मेगा टेक्सटाईल पार्क घोषित केला आहे… देशात सात शहरांत अशाप्रकारचे पार्क होणार असून यामध्ये अमरावतीचा समावेश आहे.. अमरावतीच्या प्रकल्पात 10 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. यात तब्बल 3 लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याने मोठ्या प्रमाणावर रोजगार विदर्भातील युवकांना मिळणार आहे.. नांदगाव पेठ औद्योगीक वसाहती जवळील हा प्रकल्प होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ई भूमिपूजन झाले…
ताज्या बातम्यांचे अपडेट वाचा आता मोबाईलवरच सांध्य मराठी दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वर
आजच आमच्या ग्रुप ला जॉईन व्हा !