वंचितची आघाडी!; निवडणुका जाहीर होण्याआधीच पहिली यादी जाहीर,११ उमेदवारांची घोषणा
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२१ अमरावती
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. सर्व पक्ष जोरदार तयारीला लागलेत. मतदारासंघांसह जागावाटपाची चाचपणीही केली जातेय. वंचित बहुजन आघाडीही तयारीला लागली असून त्यांनी आघाडी घेत विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय.अमरावती जिल्ह्यातून धामणगाव रेल्वे मतदार संघातून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांना उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे .
आजच आमच्या ग्रुप ला जॉईन व्हा व वाचा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक