बच्चू कडूंच्या गोष्टींना शेंडा बुडूक काही नसतं -अरविंद सावंत
बुलढाणा
तिसऱ्या आघाडीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनीही लक्ष्य केलं. “राज्यात तिसरी आघाडी सत्तेत येणार असून आमचाच मुख्यमंत्री होईल, असं बच्चू कडू म्हणाले होते. यासंदर्भात बोलताना, बच्चू कडू यांनी आतापर्यंत कितीतरी वेळा राजीनामा देण्याच्या गोष्टी केल्या आहेत. त्यांच्या गोष्टींना शेंडा बुडूक काही नसतं. त्यामुळे यासंदर्भात न बोललेलं बरं”, असे ते म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत विचारलं असता, “यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील. आमच्या पक्षाला ज्या जागा मिळतील, त्या आम्ही एकत्र मिळून लढवू आणि जिंकू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अरविंद सावंत हे बुलढाणा दौऱ्यावर असून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाबाबतही विचारण्यात आलं, यासंदर्भात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर बोलण्या ऐवजी, स्वत:च्या मुलावर बोलावं, असं प्रत्युत्तर अरविंद सावंत यांनी दिलं.