अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत जाहीर
अमरावती जिल्ह्याला केवळ ५१.०१ लक्ष
विदर्भ प्रजासत्ताक
जून २०२४ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने २३७ कोटी ७ लाख १३ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यास मंजूरी दिली आहे. मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी ही घोषणा केली. यामुळे बाधित शेतकऱ्यांना योग्य वेळी आर्थिक मदत मिळेल.तर या निधी वाटपात अमरावती जिल्ह्याला सर्वात कमी निधी देण्यात आला आहे.
या निधीमधून शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणानुसार निविष्ठा अनुदान देण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास, केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांनुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाते. केंद्राने मान्य केलेल्या नैसर्गिक आपत्तींशिवाय राज्य शासनाने अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण, आकस्मिक आग इत्यादींसारख्या घटना आपत्तीत समाविष्ट करून मदत धोरण निश्चित केले आहे.
अमरावती जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेते वर्चस्वाच्या लढाईत गुंतल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे अमरावती जिल्ह्याला या निधीत सर्वात कमी वाटा मिळाला आहे हे विशेष
जिल्हानिहाय निधी वितरण
गडचिरोली जिल्ह्यासाठी ५७७२.४२ लक्ष
वर्धा जिल्ह्यासाठी ३६९१.७६ लक्ष
चंद्रपूर जिल्ह्यासाठी ७४२९.२२ लक्ष
नागपूर जिल्ह्यासाठी १८३६.५६ लक्ष
पुणे जिल्ह्यासाठी ४५८.७१ लक्ष
सातारा जिल्ह्यासाठी ८४.८६ लक्ष
सांगली जिल्ह्यासाठी १११३.२५ लक्ष
अमरावती जिल्ह्यासाठी ५१.०१ लक्ष
अकोला जिल्ह्यासाठी १२९०.१७ लक्ष
यवतमाळ जिल्ह्यासाठी ५४७.९६ लक्ष
बुलढाणा जिल्ह्यासाठी १३५८.६६ लक्ष
वाशिम जिल्ह्यासाठी ७२.५५ लक्ष
अशा एकूण २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
———————————————————————————————-
ताज्या बातम्यांचे अपडेट व दररोज नियमित प्रकाशित होणारा
सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक आपल्या मोबाईलवरच वाचायचा असल्याचं आमच्या ग्रुपला जॉईन व्हा !