२७, २८ सप्टेंबर २०२४ रोजी राज ठाकरे साहेब अमरावतीत
मनसेचे मिशन विदर्भ ११ जिल्हयातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक अमरावतीत
दि.२४विदर्भ प्रजासत्ताक
अमरावती
आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे जोमाने
तयारीला लागले आहेत. गत ऑगस्ट महिन्यात मराठवाडा आणि विदर्भाच्या प्रत्येक जिल्हयात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्यानंतर एका महिन्यातच पुन्हा गणेशउत्सवानंतर राज ठाकरे हे अमरावती दौऱ्यावर येत असून विदर्भातील ११ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना अमरावती येथे बोलाविण्यात आले आहे. दि. २७ सप्टेंबर शुक्रवार रोजी पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ तर दि. २८ सप्टेंबर शनिवार रोजी पुर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्य बैठका राज ठाकरे स्वतः हॉटेल ग्रॅन्ड मेहफिल इन अमरावती येथे घेणार आहे. विधानसभेच्या दृष्टीने विदर्भात राज ठाकरे यांनी विशेष ताकद लावण्याचे ठरविले असून अमरावती हे केंद्रबिंदु असल्याचे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला नक्कीच उधान आलेले आहे. अमरावती शहर व जिल्ह्याच्या वतीने या संपूर्ण विदर्भातील बैठकीच्या आयोजनाकरीता मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने जोमाने प्रयत्न सुरु आहे. दि. २७ सप्टेंबर शुक्रवार रोजी अमरावती रेल्वे स्टेशनवर सकाळी ७.३० वाजता राज ठाकरे यांचे जंगी स्वागत केल्या जाणार आहे. अशी माहिती मनसे अमरावती शहराध्यक्ष धिरज तायडे व बडनेरा शहराध्यक्ष गौरव बांते यांच्यावतीने मिळालेली आहे.
ताज्या बातम्यांचे अपडेट व दररोज नियमित प्रकाशित होणारा
सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक आपल्या मोबाईलवरच वाचायचा असल्याचं आमच्या ग्रुपला जॉईन व्हा !