आम्हाला शिकवू द्या; गुरुजींचा ‘आक्रोश’!
अन्याय विरुद्ध लढण्यासाठी शिक्षकासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी
खासदार बळवंत वानखडे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हरिभाऊ मोहोड,जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती जयंत देशमुख यांची उपस्थिती
अमरावती,ता.२५:-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक प्राथमिक शाळा या उपक्रमांच्या प्रयोगशाळा बनल्या आहेत. शिक्षकांना शिकवण्याचे काम सोडून विविध ऑनलाईन कामे व अनावश्यक उपक्रम राबवल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे जायला वेळच मिळत नाही.त्यामुळे आम्हाला शिकवू द्या, असा टाहो फोडत जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारला (ता.२५) आक्रोश मोर्चा काढण्यात आला.या मोर्च्यात जिल्ह्यातील शिक्षक उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
सततच्या अशैक्षणिक कामांच्या वाढत्या वारंवारीतेमुळे शिक्षकांना शिकविण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपासून शिक्षकांना दूर लोटण्याचे धोरण सरकारने आखले आहे की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. दुर्गम भागातील कमी पटाच्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहातून बाहेर फेकण्याचे काम सरकार करत आहे. 20 पेक्षा कमी पटाच्या शाळेवर निवृत्त शिक्षक किंवा कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करून सरकार अप्रत्यक्षपणे वेठबिगारीचे धोरण राबवत आहे. शिक्षकांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांबाबत शासन स्तरावरून कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही. प्रश्न समजून घेणे व त्यावर तोडगा काढण्याच्या बाबत सरकार प्रचंड उदासीन आहे. त्यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांपुढे तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. राज्यातील सर्व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिकविणारे प्राथमिक शिक्षक सामूहिक रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.
सध्या राज्याच्या शिक्षण खात्यामध्ये विविध प्रकारचे प्रयोग राबवले जात आहेत आणि शिक्षकांना वेठबिगारासारखे राबवले जात आहे. त्यामुळे शिकवण्यासाठी शिक्षकांकडे वेळच शिल्लक नाही. नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना 1982 सालची जुनी पेन्शन योजना लागू करणे, शालेय पोषण आहाराच्या बदललेल्या पाककृतींमुळे शिक्षकांच्या अशैक्षणिक कामात भरच पडली असून ही योजना स्वतंत्र यंत्रणेकडे हस्तांतरित करणे, 10-20-30 वर्ष सेवेनंतरची आश्वासित प्रगती योजना प्राथमिक शिक्षकांना लागू कराणे, मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करणे, अशैक्षणिक कामे कमी करणे इत्यादी प्रमुख मागण्यांसह शिक्षकांच्या इतर अनेक मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळेतील शिक्षक सामूहिक रजेवर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.शिक्षक मोठ्या संख्येने अन्याय विरुद्ध लढण्यासाठी शिक्षकांनी सहभागी झाले होते.
तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना,महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना,शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद,अमरावती जिल्हा प्राथमिक शिक्षक भारती,कास्ट्राईब शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा अमरावती,प्रहार शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य उर्दु शिक्षक संघटना,अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटना,अखिल महाराष्ट्र उर्दु शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महामंडळ,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (संभाजी थोरात प्रणित),महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ,महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक सेवामंच,पदवीधर प्राथमिक शिक्षक व फ्रेंद्रप्रमुख संघटना
,वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना,चेतवा कर्मचारी संघटना यांच्यासह आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे
राजेश सावरकर, गोकुलदास राऊत, संभाजी रेवाळे, प्रशांत निमकर, नंदकिशोर पाटील, शैलश दहातोंडे, प्रविणा कोल्हे, सरीता काठोळे, सुशमा वानखडे, भावना ठाकरे,
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे किरण पाटील, गजानन चौधरी, सांजय साखरे, सुभाष सहारे, सुनिता पाटील, वृषाली देशमुख, ज्योती उभाड, प्राज्यक्ता चिमोटे, शकील अहमद,
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे गौरव काळे, रितेश जगताप, कासीम जमादार, रंजन राठोळ, रुपाली झोड, इंदिरा पोटेकर, लिना विटाळकर, प्राजक्ता मेहरे,महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे सुरेश चिमनकर, महादेव राठोड, अनिल कोल्हे, विलास देशमुख, राजाभाऊ राजनकर, नरेश शुक्ला, निलेश टोम्पे, विनायक पवार, प्रदीप राऊत, नरेंद काळे, किरण गादेकर, संजय फळ, योगीता पींजरकर, सिमा राठोड, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे प्रभाकर झोड, प्रमोद ठाकरे, गजानन कळंबे, सुनिल भावेकर, प्रफुल्ल डाफ स्वप्नील मोहोड,संदिप देशमुख, स्मिता वैद्य, अश्विनी कंगाले, परिणीता डांगरकर
शिक्षक भारतीचे
मंगेश खेरडे, रविकिरण सदानशिव, चंद्रशेखर रामटेके, प्रविण अळसपुरे, अरविंद चहऱ्हाटे,विनोद वानखडे, सतीश डोंगरे, अनिल वानखडे, मिलिंद वाहुरवाघ, अलका नेरकर,
निलिमा चौधरी, किशोर रुपनारायण,कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राजेश गाडे, आनंद कुकडे, दादाराव भोंगाडे, पद्माकर खाडे, संजय बोबडे, प्रमोद कडू, अरुण रायबोले, सुरज सोनटक्के, संध्या रायबोले, सुषमा बगाडे, रेखा गाडे, किरण कांबळे, सरोज मोहीते,महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई ३२ चे
राजेंद्र दिक्षीत, किशोर मालोकार, चंद्रकांत मामनकर, राजु डांगे, विजय खांनझोडे, शालिनी बोरखडे, शुभांगी देशमुख, मृणाली मेटे, इंदिरा रेवस्कर,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सुरेंद्र मेटे, राजकुमार खर्चान, आशिष भुयार, शिरीष माथुरकर, मनोज खोडके, सुरेंद्र पाथरे, डी.यु. गावंडे, सुरेंद्र अर्डक, सचिन वावरकर, पंकज देशमुख, श्रीधर बालपांडे, सिमा पाटील, वंदना सातपुते, प्रणिता मक्रमपुरे, मंजुषा देशमुख, संगीता पाटकर, सविता भास्कर, स्नेहा राऊत,प्रहार शिक्षक संघटनेचे महेश ठाकरे, शरद काळे, अमोल वन्हेकर, नागसेन रामटेके, दिलीप इंगळे, अमोल पंडीत, निलेश रसे,महाराष्ट्र राज्य उर्दु शिक्षक संघटनेचे
जावेद इकबाल जोहर, शहजाद अहमद, शेख मुजबुद्दीन, मुजाहीत फराज, मोहम्मद अजीम
अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना अमरावती वसीम फरहत, मोहम्मद इस्हाक, नसीम खान, सै. अहमद अली, आलिया फरहत, महेनिगार सुलताना, आफरीन कौसर, नाजिया फरहीन
अखिल महाराष्ट्र उर्दु शिक्षक संघटनेचे
अब्दुल राजीक हुसैन, नईम हुसैन, नईम हुसेन, अमीन अहमद खान,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महामंडळाचे रामेश्वर स्वर्गीय, अविनाश देशमुख, दिपक लढे, राजु चव्हाण, दत्तराज पंजाबी, संजय चांदुरकर, सुषमा भेले, वंदना देवघरे, सुनिता आगलावे, भावना यावले, मिना उंबरकर,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (संभाजी थोरात प्रणित) चे सुनिल कुकडे, अजय साव, गणेश भगत, प्रल्हाद इंगोले,महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघाचे
अरविंद बनसोड, किशोर मुंदे, देवेंद्र फड, नंदकुमार झाकर्डे, पंजाबराव जोगे, देविसिंह चव्हाण,महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक सेवामंच उमेश वाघ, देवेंद्र खैर,पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचे उमेश गोदे, अजित पाटील, रविंद्र धरमठोक, विनोद मेहरे, जानराव सुलताने, दिनेश देशमुख, ज्ञानेश्वर गायकवाड, मनोज वांगे, अशोक बावनेर, सुधीर खोडे, सुभाष बेंडे, नितीन रसे, वंदना पांडे, दमयंती उमेकर, शालिनी नागपूरे,
वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे रविंद्र राठोड, साहेबरावजी आडे, विष्णुभाऊ राठोड, नितीन चव्हाण, निरंजन चव्हाण, रेवती चव्हाण, संजय राठोड,चेतवा कर्मचारी संघटनेचे सत्येदु अभ्यंकर, किशोर गणवीर, विजय रायबोले, सविता रामटेके, श्रीकृष्ण लांजेवार, ज्योती धाकडे, आदेश तांबे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता.
——
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाली सभा
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या सभेला खासदार बळवंत वानखडे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हरिभाऊ मोहोड,जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती जयंत देशमुख,अखिल भारतीय शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष,शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष प्रभाकर झोड,महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राजेश सावरकर,
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नेते सुनील केणे,
महाराष्ट्र नगर पालिका व महानगर पालिका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मुकेश चव्हाण,अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे अब्दुल राजिक,कास्ष्ट्राईब शिक्षक संघटनेचे दादाराव भोंगाडे,सरिता काठोडे,प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे,महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना खाजगी विभागाचे रुपेश टाले,
शाळा व्यवस्थापन समितीतर्फे मुरलीधर डहाणे
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हरिभाऊ मोहोड यांनी जाहीर सभेत ‘ एकच मिशन जुनी पेन्शन ‘ योजनेची टोपी घालून जुनी पेन्शन योजनेला व मोर्च्यातील मागण्यांना पाठींबा जाहीर केला.
‘तुमचे नुकसान भरून काढू,
शिक्षकांची सूचना विद्यार्थी व पालकांसाठी शिरोधार्यच समजल्या जाते. त्यात गुरुजन जर विनंती करीत असतील तर मग त्याचा अंमल होतोच होतो. आता शिक्षक संघटनेने एका पत्रातून साद घातली आहे.
विद्यार्थ्यांना संबोधित करणारे हे पत्र आहे. ‘आम्ही शिक्षक बुधवारी सुट्टी घेऊन मोर्चा काढत आहोत – तुमच्या शिक्षणासाठी’.
२५ सप्टेंबरला बुधवारी आम्ही शिक्षक एक दिवसाची सुट्टी काढून जिल्हा मुख्यालयी मोर्चा काढला. ते का, हे समजून घ्या व आईवडिलांना पण समजावून सांगा. सरकारने जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अश्या शाळेत दोन शिक्षक असल्यास एक शिक्षक काढून घेत तिथे तात्पुरता व्यक्ती प्रथम नियुक्त करायचा व नंतर तो पण काढून टाकायचा. परिणामी शाळा एक शिक्षकी करायची. यामुळे शिक्षण थांबणार. शिक्षक नाही म्हणून विद्यार्थी येणार नाही व विद्यार्थी नाही म्हणून पुढे शाळा बंद करून टाकायची. गरजू गरिबांच्या मुलांना दुसऱ्या गावी शिकायला जावे लागेल. पाच वर्ग तुकड्यांसाठी एक शिक्षक असल्यास चांगले शिक्षण मिळणारच नाही. असे अन्य प्रश्न उभे झाले असल्याचे शिक्षक निदर्शनास आणतात. शाळा सुरू होऊन तीन महिने झालेत. पण अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. अन्य शालेय साहित्य नाही. शालेय पोषण आहारात रोज वेगवेगळे पदार्थ द्यायला सांगतात. पण आवश्यक ते अनुदान दिल्या जात नाही. शिक्षक हे मुलांना आज छान नवे काही शिकवायचे म्हणून शाळेत येतात. पण शाळेत रोज विविध कागदपत्रे तयार करणे, ऑनलाईन मिटींग्स, ऑनलाईन माहिती व डेटा पुरविणे, वेगवेगळे उपक्रम पुढ्यात असतात.या अडचणी दूर केल्या पाहिजे, अशी भूमिका शिक्षक या पत्रातून मांडतात. आवश्यक सुविधा द्या, पुरेसा वेळ शिकविण्यासाठी असू द्या. तशी निवेदने दिली. पण सरकार ऐकतच नाही. म्हणून महाराष्ट्रातील सर्व शिक्षक २५ सप्टेंबरला हक्काची रजा घेऊन मोर्चा काढणार आहे. म्हणून बुधवारी शाळेत येवू शकणार नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार. पण ते भरून काढू. शिक्षकांना शिकवू द्या व विद्यार्थ्यांना शिकू द्या,यानिमताने शिक्षकांनी सांगितले.
____________