
नया अकोला येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत प्रभारी महिला मुख्याध्यापिका आणि महिला शिक्षिका यांच्या तुफान हाणामारी
वलगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत गेल्या अनेक दिवसांपासून प्रभारी महिला मुख्याध्यापक आणि महिला शिक्षिका यांच्यात वाद चालू होते मात्र हा वाद इतका टोकाला गेला की दिनांक 13 बुधवार रोजी सकाळी सातच्या सुमारास प्रभारी महिला मुख्याध्यापिका आणि महिला शिक्षिका यांच्यात शाळेच्या स्टाफ रुममध्ये तुफान हाणामारीला सुरुवात झाली हा वाद इथेच थांबला नाहीतर वलगाव पोलीस स्टेशन येथे देखील जाऊन पोहचला प्रभारी महिला मुख्याध्यापकिने वलगाव पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार महिला शिक्षिका हे सकाळी शाळेत आली असता प्रभारी महिला मुख्याध्यापकेला म्हणाली की आज माझी अमरावती येथे मीटिंग आहे तर मी मिटींगला जाण्यासाठी आताच निघते त्यावर प्रभारी महिला मुख्याध्यापकाने असे म्हटले की तुमची मीटिंग अकरा वाजता आहे तर तुम्ही दहा वाजता जा असे म्हटले असता तेवढ्यातच प्रभारी महिला मुख्याध्यापक आणि महिला शिक्षिका यांच्यात बाचाबाची ला सुरुवात झाली या बाचाबाचीच रूपांतर हाणामारीत झालं महिला शिक्षिकेने प्रभारी महिला मुख्याध्यापकेला शिवीगाळ केली थापड बुक्क्यांनी मारहाण केली

प्रभारी महिला मुख्याध्यापकाचे डोक्याचे केस धरून मारहाण केली व गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली असा अशी तक्रार प्रभारी महिला मुख्याध्यापकाने वलगाव पोलिसांकडे केली आहे तर दुसरीकडे मात्र महिला शिक्षिकेने वलगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे की महिला शिक्षिका हे शाळेत गेली असता शाळेच्या स्टाफ रूम मध्ये प्रभारी महिला मुख्याध्यापकांनी शिक्षकेला प्रश्न विचारला की तू काल बीआरसीला गेली होती का त्यावर महिला शिक्षिकेने प्रभारी महिला मुख्याध्यापकेला उत्तर दिले की माझ्या कडे जिल्हा परिषद स्कॉलरशिप चे सराव परीक्षेचा प्रभार माझ्याकडे आहे तेव्हा मुलांचा अन्सर शीट अहवाल बीआरसीला पाच वाजताच्या अगोदर पोहोचवणे आवश्यक होते म्हणून मी बीआरसीला गेली होती त्यावर प्रभारी महिला मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला असे म्हटले की तुला शोकाज नोटीस देतो स्टॉप रूम मधून इतर शिक्षक बाहेर गेल्यानंतर प्रभारी महिला मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला लोटपाठ करून महिला शिक्षिकेचे कपडे फाडले नखाने ओरखडले आणि तुझ्याकडून काय होते करून घे अशी धमकी प्रभारी महिला मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला दिली अशी तक्रार महिला शिक्षिकेने प्रभारी महिला मुख्याध्यापकाविरुद्ध वलगाव पोलिसात केली आहे याप्रकरणी वलगाव पोलिसांनी प्रभारी महिला शिक्षकेविरुद्ध व महिला शिक्षकेविरुद्ध 115 (2) 351 (2) 324 (1) 352 असे गुन्हे दाखल केले आहेत पुढील तपास वलगाव पोलीस करत आहे.
