संजय राऊत अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी, १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२६ मुंबई
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अब्रुनुकसानीच्या खटल्या प्रकरणी संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आले आहे. राऊत यांना आता कोर्टाने १५ दिवसांची कैद सुनावण्यात आली आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी हा खटला दाखल केला होता, या खटल्या प्रकरणी आता हा निकाल कोर्टाने दिला आहे.
मेधा किरीट सोमय्या यांनी हा खटला खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दाखल केला होता. हा खटला माझगाव कोर्टात दाखल केला होता. राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा आरोप केले होते. या प्रकरणी गेल्या काही महिन्यापासून सुनावणी सुरू होती. दरम्यान, आता कोर्टाने निकाल दिला आहे. संजय राऊत यांना दोषी आढळल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी संजय राऊत यांना १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.आयपीसी सेक्शन ५०० अंतर्गत ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणी मागील काही महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. आता आज हा निकाल कोर्टाने दिला आहे. संजय राऊत यांना दोषी सिद्ध करण्यात आले आहे. आता संजय राऊत या निर्णयाविरोधात पुढच्या कोर्टात जाऊ शकतात.
अब्रुनुकसानीच्या प्रकरणात संजय राऊतांना दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर
मेधा सोमय्या यांच्याकडून तक्रार करण्यात आलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात संजय राऊत यांना माझगाव सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं. त्यांना 15 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर लगोलग संजय राऊत यांच्याकडून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्यात आला. आता या प्रकरणात संजय राऊतांना दिलासा मिळाला आहे. संजय राऊतांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. 30 दिवसांच्या आत वरच्या कोर्टात अपिल करून दाद मागण्याची मुभाही कोर्टाकडून देण्यात आली आहे.