मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अमरावतीत आगमन
अमरावती
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेसाठी ‘मिशन विदर्भ’ साठी रणनीती आखत आहेत. 27 आणि 28 सप्टेंबर रोजी दोन दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. 27 तारखेला पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणियवतमाळयापाचजिल्हाचा आढावात्यांच्याकडून घेण्यात येणार आहे. तर 28 तारखेला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, आणि चंद्रपूर जिल्हाचा आढावा घेतला जाईल.
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी 7 उमेदवार जाहीर केले आहेत. आता मनसे विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातून पहिली यादी राज ठाकरे जाहीर करण्याची शक्यता आहे. आज 27 तारखेला सकाळी 7.30 वाजता राज ठाकरे यांच अमरावतीत रेल्वे स्टेशनवर आगमन होताच मनसे कार्यकर्त्यांनी ढोल ,ताशे,फटाके फोडत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी
कार्यक्रमा दरम्यान राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातील नेत्यांची यादी जाहीर करतील असे बोलले जात आहे.
जिल्ह्यासह राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचा दररोज सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वर